Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Compensation : केळी, कांद्याची भरपाई कधी?

Compensation Demand of Farmer : सलग दोन दिवस गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच जणू हिरावला घेतला. नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई दिली जावी, अशी मागणी केली जात आहे.

Team Agrowon

Jalgaon News : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे व परिसरात २६ ते २८ फेब्रुवारी यादरम्यान गारपीट व वादळी पाऊस झाला. यात कोट्यवधींची पीकहानी परिसरात झाली. सलग दोन दिवस गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच जणू हिरावला घेतला. नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई दिली जावी, अशी मागणी केली जात आहे.

पीक जोमात असताना ते जमीनदोस्त झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून अहवालही तयार केला आहे. आता नुकसानीची भरपाई तत्काळ मिळावी, अशी मागणी होत आहे.

मेहुणबारेसह परिसरातील धामणगाव, जामदा, भऊर, खडकीसीम, दसेगाव, लोंढे, दरेगाव, पिंजारपाडे, विसापूर, चिंचगव्हाण, कृष्णापुरी तांडा, वरखेडे तांडा, वरखेडे गाव, पळासरे, पिंपळवाडी, दहिवद भागांत वादळी पावसात मोठी हानी झाली.

जवळपास २० ते २५ मिनिटांच्या या वादळामुळे या परिसरातील शेतांमधील पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली. काही भागांत मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. ज्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, मका, केळी, पपई, शेवगा, टरबूज, लिंबू आदींचे नुकसान झाले. शेतांमध्ये गारांचा खच पडला. वादळात शेतातील मल्चिंग पेपर फाटून काही शेतांमध्ये शेडनेटचेही नुकसान झाले.

केळीच्या बागा उद्ध्वस्त

वरखेडे भागातील केळीला वादळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. या भागातील केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. केळीचे पीक काढणीवर आलेले असतानाच होत्याचे नव्हते झाले. वलठाण, पाटणा, चंडिकावाडी, बेलदारवाडी, गणपूर, कोदगाव, गणेशपूर, चितेगाव, पिंप्री बुद्रुक व प्र. चा., वाघडू, तांबोळे बुद्रुक व खुर्द, निमखेडी, बाणगाव, रांजणगाव, पिंपरखेड, शिवापूर, लोंजे, आंबेहोळ, खेरडे, सोनगाव, बोढरे, सांगवी, तळोंदे, जामदा, सायगाव, अलवाडी, नांद्रा, पिंपळवाड म्हाळसा गावातही पीकहानी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT