Wheat Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Sowing : रिसोड तालुक्यात गव्हाचा पेरा कमी होण्याची शक्यता

Rabi Sowing : रब्बी पिकाच्या पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे पेरण्यांनी आता वेग घेतला आहे.

Team Agrowon

Washim News : तालुक्यात रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. यंदा पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे गव्हाच्या लागवड क्षेत्रात घट होईल. रब्बी पिकाच्या पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे पेरण्यांनी आता वेग घेतला आहे.

या वर्षी पावसात सरासरी तूट आहे. सुरुवातीपासूनच पाऊस हा अनियमित व लहरी स्वरूपाचा पडल्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली नाही. पावसाअभावी व पिवळा मोझॅकमुळे खरिपातील सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट आली.

शेतकऱ्यांना मशागत व रब्बीची पेरणी कशी करावी, असा प्रश्‍न पडला आहे. त्यातच सोयाबीनचे भावही कमालीचे कमी झाले आहेत. तरी शेतकरी रब्बीच्या तयारीला लागला आहे.

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होत असून, तुरीचे पिकही संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतातील ओलावा कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांची हरभरा पेरणीसाठी लगबग वाढली आहे. पाणी पातळीत वाढ झाली नसल्यामुळे गव्हाचा पेरा कमी होण्याची चिन्हे आहेत.

कोरडवाहू शेतकऱ्यांना तर रब्बीची आशाही धूसर झाली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून रब्बी पिकांच्या पेरणीची लगबग वाढली आहे.

थंडीला सुरुवात झाली असली, तरी दिवसाच्या तापमानामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. या वर्षी पाणीसाठा कमी असल्यामुळे गव्हाऐवजी हरभरा, करडई, सूर्यफूल या पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार, असे शेतकरी सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT