Vegetable Market Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Market : आठवडा बाजाराची चलती

Latest Agriculture News : तळा येथील आठवडा बाजाराला ग्रामस्‍थांची पसंती मिळत आहे. सध्या बाजारात भाजीपाला स्‍वस्‍त मिळत असून सुकी मासळीदेखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे.

Team Agrowon

Tala News : तळा येथील आठवडा बाजाराला ग्रामस्‍थांची पसंती मिळत आहे. सध्या बाजारात भाजीपाला स्‍वस्‍त मिळत असून सुकी मासळीदेखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे. त्‍यामुळे आठवडा बाजाराला ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.

खेडोपाडी भरणाऱ्या आठवडा बाजारात खरेदीसाठी कष्टकरी, मोलमजुरी करणारे अधिक असतात. तसेच ग्रामस्‍थदेखील मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. मध्यंतरी शहरातील शॉपिंग मॉलमुळे आठवडा बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती.

मात्र महागाईमुळे पुन्‍हा आठवडा बाजाराला ग्राहकांची पसंती मिळत आहे. यामध्ये मोलमजुरी करणाऱ्या महिलांची गर्दी अधिक असते. सहा दिवस काम करून आठवड्याच्‍या शेवटी मिळणाऱ्या पगारातून आठवडा बाजार केला जातो.

सध्या आठवडा बाजारामध्ये भाजीपाला स्‍वस्‍त दरात मिळत असल्‍याचे सांगण्यात येत आहे. शिवाय हा भाजीपाला जवळील तालुक्‍यातील असल्‍याने तो ताजा असल्‍याचे गृहणींकडून सांगण्यात येत आहे. तसेच सुकी मासळीला मोठी पसंती मिळत असून खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. त्‍यामुळे आठवडा बाजाराला चांगले दिवस आल्‍याचे व्‍यापाऱ्यांनी सांगितले.

आम्ही मोलमजुरीला जातो. आठवड्यातून एकदा पगार होतो. सध्या महागाई वाढली असल्‍याने मोठ्या दुकानात अथवा मॉलमध्ये जाणे परवडत नाही. त्यामुळे आठवड्यात लागणारी वस्तू आम्ही बाजारात खरेदी करतो. थोडे स्वस्त मिळत असल्‍याने आठवडा बाजार परवडतो.
- मनाली करकरे, गृहिणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT