Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : नांदेडला फळपीक विमा योजना राबवविणार

Crop Insurance Scheme : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहाभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे.

Team Agrowon

Nanded News : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना नांदेड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीकडून मृग बहार सन २०२४ मध्ये मोसंबी, चिकू, पेरू, सीताफळ व लिंबू या पाच फळपिकांसाठी तर आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये संत्रा, मोसंबी, केळी, आंबा व पपई या पाच फळपिकांसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येणार आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहाभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे. परंतु फळपिकांची ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे केलेली नाही.

त्यांनी २५ एप्रिल, २०२५ पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी. अन्यथा १२ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदी नुसार सातबारा उताऱ्यावर ई-पिक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपिक विम्याचा लाभदिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

या बाबतीत सविस्तर माहितीचा १२ जून २०२४ चा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT