Crop Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Variety : शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करण्यासाठी जोमाने काम करू

Agriculture University : कृषी विद्यापीठ कोणताही वाण शेतकरी बांधवांना देण्यापूर्वी खूप काळजी घेते. म्हणून विद्यापीठनिर्मित वाणांवर राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वास आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : कृषी विद्यापीठ कोणताही वाण शेतकरी बांधवांना देण्यापूर्वी खूप काळजी घेते. म्हणून विद्यापीठनिर्मित वाणांवर राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वास आहे. हा विश्वास दृढ करण्यासाठी आणखी जोमाने काम करू, असे मत कडधान्य पैदासकार डॉ. दीपक पाटील यांनी व्यक्त केले.

खादगाव (ता. पैठण) येथील प्रगतिशील तूर उत्पादक शेतकरी श्रीभागवतराव डाके यांच्या शेतात तूर वाण गोदावरी शेतीदिन नुकताच पार पडला. त्या वेळी डॉ. पाटील बोलत होते. या वेळी तूर उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षी गोदावरी वाणामुळे आमच्या गवशिवाराचे तुरीचे उत्पादन नक्कीच वाढेल, असा विश्‍वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे गोदावरी वाण आम्हाला पसंत पडले, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. या गावात मागील सात वर्षांपासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तूर वाणाची लागवड शेतकरी करतात. आधी ४ वर्षे बीडीएन ७११ आणि मागील तीन वर्षांपासून गोदावरी या बागायती वाणाची शेतकरी लागवड करत असल्याची माहिती रामेश्वर ठोंबरे यांनी शास्त्रज्ञांना दिली.

कडधान्य पैदासकार डॉ. पाटील म्हणाले, की विद्यापीठाला एक वाणनिर्मिती करण्यासाठी मोठा कालावधी व खर्च करावा लागतो. तो वेगवेगळ्या अंगाने तपासला जातो. त्याला चारही कृषी विद्यापीठांची अनुमती लागते. तेव्हा तो वाण शेतकऱ्यांपर्यंत येतो. सध्या ढगाळ वातारणामुळे तूर पिकावर अरिष्ट आले आहे.

यामुळे फूलगळ होईल आणि शेंग माशीचा प्रादुर्भावही होऊ शकतो. त्यासाठी फुलोरा व वादी अवस्थेतील तूर पिकाची काळजी घ्यावी लागेल. फूलगळ होऊ नये यासाठी प्लानोफिक्स २ मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. खादगावच्या शेतकरी बांधवांनी मेहनत घेऊन या वाणाचे महत्त्व इतर शेतकऱ्यांच्या नजरेत आणून दिल्याची बाब डॉ. पाटील यांनी अधोरेखित केली.

या वेळी झालेल्या गट चर्चेत सोपानराव डाके, सुदाम डाके, भरत जाधव, धनंजय डाके, डॉ. अप्पासाहेब डाके यांसह अनेक शेतकऱ्यांनी या पिकाबाबत असणाऱ्या समस्यांची मांडणी केली. गोदावरी तूर पीक शेती शिवारफेरीत डॉ. अप्पासाहेब डाके, सोपानराव डाके, सुदाम डाके, ज्ञानेश्वर डाके आदी गोदावरी वाण उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sant Palkhi Update: संतांचे पालखी सोहळे पंढरपूरच्या वेशीवर

Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत पुणे जिल्ह्यातील शेतकरी

Livestock Vaccination Campaign: ‘लाळ्या खुरकूत’ प्रतिबंधक लसीकरण मोहीम १३ ऑगस्टपासून

MGNREGA Fund Pending: ‘मनरेगा’च्या कुशल कामांचे ३,१८२ कोटी अडकले

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेच्या नावाखाली सरकारकडून शेतकऱ्यांची माकडचेष्टा : राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT