Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : शेतीसाठी ‘उजनी’तून आज पाणी सोडणार

Ujani Dam Water Level : एक नोव्हेंबरपासून शेतीसाठी पाणी सोडण्यास तत्त्वतः मान्यता मिळाली, पण प्रत्यक्षात पाणी सोडण्यात आले नाही. दरम्यान, आता आज (ता. ४) पाणी सोडले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Team Agrowon

Solapur News : खरीप हा आधीच वाया गेला, आता रब्बीच्या पिकांसाठी पाण्याची मोठी गरज आहे. अनेक तालुक्यांमध्ये अपेक्षित पेरण्या देखील झालेल्या नाहीत. त्यामुळे एक नोव्हेंबरपासून शेतीसाठी पाणी सोडण्यास तत्त्वतः मान्यता मिळाली, पण प्रत्यक्षात पाणी सोडण्यात आले नाही. दरम्यान, आता आज (ता. ४) पाणी सोडले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उजनी धरणात सध्या एकूण साठा ९२.७९ टीएमसीपर्यंत आहे, पण त्यात १८ ते २० टीएमसीपर्यंत गाळच आहे. तर दहा ते १५ टीएमसी पाणी धरणात राखीव ठेवले जाते. त्यात पुन्हा बाष्पीभवनातून आठ टीएमसीपर्यंत पाणी जाते.

आता धरणातील ५० टीएमसी पाणी वापरात येऊ शकते. त्यात शेतीसाठी दोन, पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी एक आवर्तन आणि उर्वरित पाणी पिण्यासाठीच राखून ठेवले जाणार आहे. पण शेतीसाठीही पाणी महत्त्वाचे आहे.

खरीप पिके हातची गेली, आता रब्बी पिकांवर आशा ठेवून बसलेल्या शेतकऱ्यांकडून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी होत होती. त्यानुसार जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्याच बैठकीत शेतीसाठी एक नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यास तत्त्वतः मान्यता दिली. परंतु अंतिम निर्णय झाला नाही. आता आज (ता. ४) पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT