Irrigation Department Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Department : ‘क्यूआर’ कोडद्वारे होणार पाणीपट्टी वसुली

सध्या जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांची सिंचन पाणीपट्टी वसुली सहकारी साखर कारखान्यामार्फत व रोखीने केली जाते.

Team Agrowon

Sangli Irrigation Department News : पाटबंधारे विभागामार्फत ऑनलाइन (Online) पद्धतीने ‘क्यूआर’ कोडद्वारे लाभधारक शेतकऱ्यांची पाणीपट्टी वसुलीचे काम हाती घेतले आहे. सिंचन कर्मचारी ‘क्यूआर’ कोडद्वारे लाभधारक शेतकऱ्यांची पाणीपट्टी जागेवरच वसूल करू शकतो.

लाभधारक शेतकऱ्यांची भरणा झाल्याची पोहोच ऑनलाइन पहाता येणार आहे, अशी माहिती पाटबंधारेच्या सूत्रांनी दिली आहे.

सांगली पाटबंधारे विभागाकडून (Irrigation Department) सिंचन व्यवस्थापनाचे काम केले जाते. यामध्ये लाभधारक शेतकऱ्यांना पाणीपुरवठा (Water Supply) करून पाणीपट्टी वसुली केली जाते. वसुलीसाठी सिंचन कर्मचारी दुवा आहे.

सध्या जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांची सिंचन पाणीपट्टी वसुली सहकारी साखर कारखान्यामार्फत व रोखीने केली जाते.

दुर्गम भागातील जत, संख, कुची या शाखा कार्यालयांकडील सिंचन कर्मचाऱ्यांना बँक शाखा जवळ नसल्याने मिरज शहरात येऊन पाणीपट्टीचा भरणा करावा लागतो.

कर्मचाऱ्यांचा ताण व आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने वसुली करण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT