Tanker water supply Agrowon
ॲग्रो विशेष

Tanker water supply : गावपाड्यात टॅंकरने पाणीपुरवठा

शहापूर तालुक्यात जानेवारी महिन्यातच पाणी टंचाई सुरू झाल्याने पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने दोन गावे व चार पाड्यांना दोन टँकरने पाणीपुरवठा जानेवारीपासून सुरू केला आहे.

Team Agrowon

Shahpur News : धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या तालुक्यात पाणीटंचाईची समस्या आजही तशीच आहे. शासनस्तरावर पाणीटंचाई (Water Shortage) दूर करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असल्या, तरी आजतागायत पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर झालेली नाही.

परिणामी या महिन्यात तालुक्यातील ९ गावे अणि ३५ पाड्यांना ११ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. असे असले तरी तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसह पाळीव व जंगली प्राण्यांचे हाल होत आहेत.

शहापूर तालुक्यात जानेवारी महिन्यातच पाणी टंचाई सुरू झाल्याने पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने दोन गावे व चार पाड्यांना दोन टँकरने पाणीपुरवठा जानेवारीपासून सुरू केला आहे.

आता अवघ्या दोन महिन्यांत पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या गाव-पाड्यांचा आकडा ४४ वर गेला आहे. त्यामुळे या ४४ गाव पाड्यांना ११ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

यंदा शहापूर तालुक्यातील २२८ गावे व ४३७ पाड्यांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागेल, असा अंदाज बांधून त्यासाठी ५० कोटी रुपये खर्चाचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

मागील वर्षी ७ मार्चला टॅंकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली होती. मात्र यंदा जानेवारी महिन्यातच टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी आल्याने दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र जाणवत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यानुसार तालुक्यातील गाव-पाड्यांच्या मागणीनुसार प्रत्येक महिन्याला टॅंकर वाढत आहे.

आणखी ६२ पाड्यांना टॅंकरची गरज

तालुक्यातील तीन गावे आणि १७ पाड्यांचा पाच टँकरचा प्रस्ताव १० मार्च रोजी उपविभागीय अधिकारी भिवंडी यांचेकडे सादर करण्यात आला आहे.

१२ गावे व ४५ पाड्यांना ११ टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

त्यामुळे काही दिवसात एकूण १५ गावे आणि ६२ पाड्यांना १६ टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले.

एप्रिल व मे महिने हे तीव्र उष्णता निर्माण करणारे महिने असल्याने टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT