Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Water Storage : खानदेशात जलसाठा स्थिर

Water Stock : खानदेशात सर्वत्र चांगला पाऊस झाला. परंतु यामुळे सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ झाली आहे. जलसाठा स्थिर असून, ओलावा असल्याने पिकांच्या सिंचनाची कार्यवाही बंद आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सर्वत्र चांगला पाऊस झाला. परंतु यामुळे सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ झाली आहे. जलसाठा स्थिर असून, ओलावा असल्याने पिकांच्या सिंचनाची कार्यवाही बंद आहे. यामुळे भूगर्भातील पाणी उपसा बंदावस्थेत आहे.

सध्या कूपनलिका, विहिरी व इतर कृत्रीम जलसाठ्यांमधून पिकांच्या सिंचनाची कार्यवाही अपवाद वगळता सुरू नाही. अर्थात पावसामुळे पाण्याची बचत झाली आहे. सतत जोरदार किंवा अतिजोरदार पाऊस काही भागात असल्याने सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ झाली आहे.

खानदेशातील एकूण जलसाठ्यात मागील हंगामात हिवाळ्यात व पुढेही सतत घट झाली गोती. कारण ऑक्टोबरमध्ये पाऊस नव्हता. परतीचा पाऊस नसल्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच सिंचनाचे काम सुरू झाले. यामुळे कूपनलिका, विहिरी व इतर कृत्रीम जलसाठ्यांमधून पाण्याचा उपसा वेगात सुरू होता.

पण यंदा तशी स्थिती नाही. सध्या तापी नदीवरील हतनूर, वाघूर, गिरणा नदी प्रवाही आहे. पावसामुळे शेतीसंबंधीच्या पाण्याची बचत झाल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. कापूस, ऊस, ज्वारी, मका, केळी, भाजीपाला, फळ पिकांना सध्या काही दिवस सिंचनाची गरज नाही. कारण सर्वत्र पाऊस झाला आहे.

सतत पाऊस असल्याने ओलावा अधिक आहे. शेतकरी कोरडे, सूर्यप्रकाशित वातावरण असायला हवे, अशी प्रतीक्षा करीत आहेत. पाणीउपसा बंद असल्याने भूगर्भातील जलसाठा टिकून आहे. परतीचा पाऊस आल्यास पुढेही पाणीवापर कूपनलिका व विहिरींतून होणार नाही. यामुळे रब्बीतही पाण्याची सुरुवातीला गरज कमी राहील व कोरडवाहू पिकांची पेरणीही बऱ्यापैकी होईल, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT