Solar Energy Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scheme : राजाळेत सौरऊर्जेवर पाणी योजना

Solar Energy : राजाळे (ता. फलटण) गावात जलजीवन मिशनअंतर्गत १५ कोटी रुपयांची पाणी योजना लवकरच कार्यान्वीत होणार आहे.

Team Agrowon

Satara News : राजाळे (ता. फलटण) गावात जलजीवन मिशनअंतर्गत १५ कोटी रुपयांची पाणी योजना लवकरच कार्यान्वीत होणार आहे. जिल्हा दिशा समितीचे सदस्य विश्वासराव भोसले यांनी विशेष बाब म्हणून जलजीवन मिशनअंतर्गत पाणी योजनांना सोलर सिस्टम बसवण्याचे धोरण निश्चित करून घेतल्याची माहिती सरपंच स्वाती दोंदे यांनी दिली.

सौर यंत्रणेमुळे गावांना भविष्यात वीजबिल येणार नाही. विजेअभावी भविष्यात पाण्याची टंचाईही भासणार नाही. याशिवाय ग्रामस्थांना पाणीपट्टी व वीजबिलाची झळ बसणार नाही. पिंपरद येथील चौकीजवळील मुख्य साठवण टाकीचे काम पूर्णत्वास आले आहे. या टाकीद्वारे गावातील सर्व टाक्या ग्रॅव्हिटीने भरल्या जाणार आहेत. साठवण तलावाचा आराखड्याप्रमाणे नियोजित केला आहे.

तलावाच्या भिंतीवरील बाजूस स्वतंत्र अतिरिक्त पाथ-वे दिला आहे. त्यावर दक्षिणमुखी सोलर पॅनेल बसणार आहे. ते स्प्रिंकलरद्वारे दररोज स्वच्छ करण्यात येईल. हे पाणी पॅनेलच्या तळात नियोजित केलेल्या पाइपच्या गटारमधून बाहेर काढले जाईल.

या पॅनेलमधून दररोज आठ तासांत सुमारे ३० किलो वॅट ऊर्जा निर्माण होईल. तेवढ्याच वेळात मुख्य साठवण टाकीत सौर ऊर्जेद्वारे पाणी पंपिंग होणार आहे. शेजारीच पिंपरद गावचा साठवण तलाव असून, दोन्हीही साठवण तलावावर प्रत्येकी ३०-३० किलो वॅटची सौर यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. यातून शिल्लक राहणारी वीज ही वीज मंडळाला दिली जाईल. त्यातून तेथील सुरक्षारक्षक, देखभाल दुरुस्तीचा खर्च निघेल, अशी व्यवस्था आहे.

लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन

योजनेसाठी गावातील ज्या रस्त्यांचे खोदकाम झाले आहे. त्याचे लवकरच व्यवस्थापन केले जाईल. ग्रामस्थांना विशेष पत्राद्वारे आवाहन केल्यानुसार दहा टक्के लोकवर्गणी जमा करावी, असे आवाहन राजाळे ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT