Water In Amravati
Water In Amravati  Agrowon
ॲग्रो विशेष

Amravati Water Issue: अमरावतीत २५ ठिकाणी पाणी पिण्यास अयोग्य; अकोला बुलढाणा, पुणेसह अहमदनगरला वळवाचा तडाखा

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या वर्षी पाठ केलेल्या पावसामुळे यंदा राज्याच्या बऱ्याच भागात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान अमरावती जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून ८ तालुक्यात पाण्यात मात्र पाणी पिण्यायोग्य नसल्याचे समोर आले आहे. येथील २५ ठिकाणचे पाणी हे पिण्यास अयोग्य आहे. अमरावतीत अशी गंभीर स्थिती असतानाच अकोल्यासह बुलढाण्यात वळवाचा पावसाने तडाखा दिला आहे. अकोल्यात गेल्या तीन दिवसापासून वळवाचा पाऊस बरसत असून गारपीट झाल्याने केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.

आरोग्य विभागाचा खूलासा

अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात सध्या तीव्र पाणी टंचाई आहे. येथे अनेक गाव आणि वाड्यावस्त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून टँकरवर पाण्यासाठी निर्भर व्हावे लागले आहे. सध्या अमरावती जिल्ह्यातील १० गांवाना १३ टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

यादरम्यान अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील १४९१ ठिकाणचे पाण्याचे नमुने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून तपासणीसाठी घेतले होते. यापैकी ८ तालुक्यातील २५ ठिकाणचे पाणी हे पिण्यास अयोग्य असल्याचे उघड झाले आहे. यावरून जिप प्रशासनाकडून गटविकास अधिकाऱ्यांसह तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे.

अकोल्यात गारपीट

राज्याच्या विविध भागात सध्या वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस आणि गारपीट होत आहे. अशाच वादळी वारा, गारपीट आणि वळवाच्या पावसामुळे अकोल्यातील शेतकरी संकटात सापडा आहे. येथे सोमवारी (ता.२०) झालेल्या पावसामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आला आहे.

अकोला जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून वळीव जोर धरून आहे. येथे सोमवारी झालेल्या पावसासह गारपिटीने काही गावांना झोडपून काढले. यात धामणगाव येथील तोडणीला आलेल्या केळी पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वारा आणि गारपीट झाल्याने उभे केळी पीक आडवे झाले. यामुळे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बुलढाण्यात पावसाने नुकसान

सोमवारी झालेल्या पावसाने बुलढाण्यातील बीबी परिसरात आणि खामगाव तालुक्यात मोठे नुकसान केले. बीबी परिसरात सायंकाळी झालेल्या पावसाने ७० वर्ष जुने बाभळीचे झाड उन्मळून पडले. यामुळे मलकापूर, बुलडाणा, साखरखेर्डा, खामगाव रस्ता बंद झाला. तसेच जनावरांचा चारा भिजण्यासह घरावरील पत्रे उडून जाऊन मोठे नुकसान झाले. बीबी मांडवा रोडवर वादळी वाऱ्याने कोसळलेल्या झाडामुळे काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता.

खामगावात कांद्याने रडवले

खामगाव तालुक्यात कांद्याची मोठी लागवड करण्यात आली असून आता कांदा काढणीला आला आहे. मात्र येथे झालेल्या आधी अवकाळी आणि आता वळवाच्या पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यामुळे लागवडीसाठी घातलेला खर्चही निघेल की नाही अशी चिंता कांदा उत्पादकांमध्ये आहे.

तालुक्यात जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कांद्याची लागवड केली जाते. जो एप्रिल ते मेमध्ये काढणीस येतो. एका एकरात ८० ते १०० क्विंटलच्या जवळपास कांदा निघतो. पण यंदा आधी अवकाळी आणि आता वळवाच्या पावसाने यावर पाणी फेरले आहे. यंदा एकरी ४० ते ५० टक्के घट झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक चिंतेत असून शेतकरी आर्थिक संकटात आला आहे.

पुण्याच्या घोरपडीत झाडे पडली

सोमवारी पुण्याच्या घोरपडी परिसरात विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे येथे अनेक ठिकाणी झाडे पडली. येथील एम्प्रेस गार्डन जवळ संध्याकाळी सावरीचे झाड रस्त्यावर पडले. यात येथून जाणारी चारचाकी अडकली. यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनातील प्रवासी गंभीर जखमी झाला. यावेळी घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाच्या जवानांनी चारचाकीचे छत कापून गाडीतील व्यक्तीला बाहेर काढले.

अठरा घरांसह फळबागांना तडाखा

अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे येथे सात तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे १८ घरांचे नुकसान झाले असून २६ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांना या पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागातील अकोले, राहाता तालुक्यातील अनेक गावांमध्ये झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा ठप्प होता. राहाता तालुक्यात वादळी पावसाने दाणादाण करत दहा घरांचे नुकसान केले. येथे घरावरील छताचे पत्रे उडाल्याने संसारोपयोगी साहित्य भीजले. तर आंबा, केळी, डाळिंब या फळबागांना फटका बसला असून येथील २१. ५२ हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले आहे. तसेच ४.७ हेक्टर कर्जत तालूका, अकोले तालुक्यातील १. १० हेक्टर क्षेत्रावरील बागांचे देखील नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain : माॅन्सूनचा प्रवास सुसाट; पावसाचाही अंदाज; राज्यातील अनेक भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज

Maharashtra Budget 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला पात्र? दरमहा मिळणार १५०० रुपये

Soybean, Cotton Rate: कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

Solar Pump Scheme : शेतकऱ्यांसाठी 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा

Budget 2024 : राज्यातील महिलांना मिळणार दरमहा १ हजार ५०० रुपये; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT