Tembhu Irrigation Project Agrowon
ॲग्रो विशेष

Tembhu Irrigation Scheme : मार्चअखेर टेंभूचे पाणी सोडणार माण नदीत

Agriculture Irrigation : टेंभू योजनेच्या पाण्याने मार्चअखेर खवासपूर ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे पुरेशा पाण्याने भरून देण्यात येणार आहेत.

Team Agrowon

Sangola News : टेंभू योजनेच्या पाण्याने मार्चअखेर खवासपूर ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे पुरेशा पाण्याने भरून देण्यात येणार आहेत. टेंभूच्या आवर्तनाचे पाणी सर्व गावांना व्यवस्थित देऊन माण नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन करून पाणी सोडण्याच्या टेंभूच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली.

टेंभू योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचे नियोजन करण्यासाठी आमदार शहाजी पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार, उपअभियंता गायकवाड, शाखा अभियंता महेश पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार पाटील यांनी टेंभू योजनेतून लाभक्षेत्रातील जुनोनी, हातीद, पाचेगाव जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी या गावातील तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरून टेंभूचे माण नदीमध्ये पाणी सोडून खवासपूर ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. कोणत्याही गावाला पाणी कमी पडू नये याची दक्षता घेण्याच्याही सूचना आमदार पाटील यांनी दिल्या होत्या.

आमदार शहाजी पाटील यांच्या सूचनेची दखल घेत टेंभूच्या अधिकाऱ्यांनी टेंभू योजनेच्या पाण्याने जुनोनी, हातीद, पाचेगाव जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी या गावातील तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याचे काम सुरू केले आहे.

उपलब्ध पाण्यानुसार जुनोनी तलाव ओव्हर फ्लो करून त्या खालील असणारे ओढ्यावरील बंधाऱ्यात पुरेसे पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ग्रामस्थांनी परस्पर कालव्यावरील आऊटलेट ओपन करू नये, अन्यथा पाणी देण्याच्या नियोजनात बदल होऊन वेळ होवू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT