Agriculture Irigation Agrowon
ॲग्रो विशेष

Takari Irrigation : ‘ताकारी’चे पाणी कार्वेपर्यंत पोहोचले

Agriculture Irrigation : मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या ताकारी योजनेचे पाणी कडेगाव तालुक्यातील लाभक्षेत्राची तहान भागवून खानापूर तालुक्यातील कार्वेजवळून वाहत आहे.

Team Agrowon

Sangli News : मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या ताकारी योजनेचे पाणी कडेगाव तालुक्यातील लाभक्षेत्राची तहान भागवून खानापूर तालुक्यातील कार्वेजवळून वाहत आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी आल्याने शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे.

सोडलेले पाणी आवर्तन पूर्ण क्षमतेने आणि शेवटच्या शेतात पोहोचेपर्यंत सुरूच राहील, अशी खात्री कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली. आठवड्यापूर्वी, ४ फेब्रुवारीला योजनेचे ९ पंप सुरू करून पाणी देण्यात आले होते.

सुरवातीच्या कडेगाव तालुक्यातील लाभक्षेत्राची तहान भागवून हे पाणी ३ दिवसांपासून खानापूर तालुक्यातील गावांतून वाहत आहे. सध्या या पाण्याने ८० किलोमीटरचा मुख्य कालवा पार केला आहे.

ताकारी लाभक्षेत्रातील पाणी मागणी विचारात घेऊन पाटबंधारे विभागाने ताकारी योजनेचे या वर्षीचे तिसरे व रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन २२ जानेवारीला सुरू केले होते. परंतु सांगलीजवळ कृष्णा नदीपात्र उघडे पडून पाणीटंचाई निर्माण झाल्याने ताकारी व टेंभू योजनेचे निम्मे पंप बंद करण्यात आले होते.

यावर पर्याय निघताच ४ फेब्रुवारीला पुनश्चः पाणी सुरू झाले. सध्या योजनेचे दोन्ही टप्प्यांवरील ११ पंप सुरू करण्यात आले असून टप्पा ३ वरून ३ पंप आणि टप्पा ४ वरील २ पंप सुरू करून सोनहिरा खोऱ्यासह तडसर परिसरांत पाणी सोडण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT