Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : पाणीटंचाई एकाला, निधी टाकला दुसऱ्या गावाला

Water Scarcity : चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांत भीषण पाणीटंचाई आहे. त्या गावांची नावे कृती आराखड्यात समाविष्ट आहेत.

Team Agrowon

Amaravati News : चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांत भीषण पाणीटंचाई आहे. त्या गावांची नावे कृती आराखड्यात समाविष्ट आहेत. असे असतानाही ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या अभियंत्यांच्या अजब धोरणामुळे दुसऱ्याच गावात निधी वळविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे चांगलाच संताप व्यक्त करण्यात येत आहे.

चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांतील नागरिकांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. असे असताना त्या गावात पुन्हा पुन्हा तीच परिस्थिती उद्‍भवू नये, याकरिता पंचायत समितीच्या कृती आराखड्यात त्या गावाची नावे समाविष्ट केल्या गेलीत.

पण चिखलदरा येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या टंचाईग्रस्त गावांना निधी न टाकता पाणीदार गावांना आवश्यकता नसतानाही निधी टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पाणीटंचाई ग्रस्त गावातील सरपंचांनी आक्षेप घेतला असून, चिखलदरा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता मलाई घेऊन पाणीदार गावांना निधी देत असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणाची तक्रार आता थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

टँकर लागलेली गावे

आकी, बहादरपूर, मोथा, आलडोह, खडीमल, गवळी ढाणा, तारुबांधा, कोरडा, मेहरिआम व लवादा.

निधी टाकलेली पाणीदार गावे

सेमाडोह, राजनीकुंड, ढाकाना, खुटिदा, हत्तीघाट, खटकाली, डोमी, भांद्री, कुलंगना व गिरगुटी.

विहिरीचे खोलीकरण तसेच पाइपलाइनवर दोन ते तीन लाख रुपये खर्च आहे. तसा ठराव ग्रामपंचायतने चार महिन्यांपूर्वीच घेतला होता तसेच कृती आराखड्यात सुद्धा मंजूर करून घेतला होता. परंतु संबंधित पाणीपुरवठा अभियंता हे राजकारण करीत आहेत. आमच्या गावाला हेतुपुरस्सर त्यांनी डावलले. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
- इंद्रायणी राजेश जावरकर सरपंच, आकी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT