Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : मिरज पूर्वभागातील तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची मागणी

Water Storage : गेल्या पंधरवड्यापासून वाढतच चाललेल्या उन्हामुळे मिरज पूर्व भागातील काही भागांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. पुढील दोन महिने कडक उन्हाळ्याचे असल्याने या भागातील टंचाईची स्थिती वाढणार आहे.

Team Agrowon

Sangli News : गेल्या पंधरवड्यापासून वाढतच चाललेल्या उन्हामुळे मिरज पूर्व भागातील काही भागांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. पुढील दोन महिने कडक उन्हाळ्याचे असल्याने या भागातील टंचाईची स्थिती वाढणार आहे. त्यामुळे या भागातील सर्वच तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून पूर्ण क्षमतेने भरण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी प्रशासनाने निधीची तरतूद करत पाण्याची सोय करण्याची मागणी होत आहे.

पावसाळ्यानंतर निर्माण होणाऱ्या टंचाईच्या स्थितीवेळी नेहमीच म्हैसाळ योजनेचे पाणी उपयोगी ठरत असते. यंदाही फेब्रुवारीतच अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवली आहे. पाण्याची अडचण ओळखून म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे.

यात सुरुवातीला पुढे कवठेमहांकाळ, जतपर्यंत पाणी पोहोचवणे आवश्‍यक असल्याने मिरज पूर्वभागातील कालव्यांना पाणी सोडण्यात आले नव्हते. आता पाणी शेवटच्या लाभक्षेत्रात पोहोचल्याने डोंगरवाडी उपशासह इतर सर्व योजनांतून पाणी सोडण्याची मागणी होत होती. सध्या पाणी मिळत असले तरी ते शेतकऱ्यांच्या आवश्‍यकतेप्रमाणे मिळत नाही.

पूर्वभागातील अनेक शेतकऱ्यांनी धाडसाने भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. यात पाणी नसल्याने माल करपून गेल्यानंतर काही ठिकाणी गेल्यावर्षी पाणी पोहोचले होते. त्यामुळे ज्यावेळी आवश्‍यकता आहे,

त्यावेळीच तत्काळ पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा देणेही आवश्‍यक आहे. मिरज पूर्व भागात केवळ शेतीच्याच पाण्यासाठी नव्हे, तर गावातील पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम झालेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT