Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Yavatmal Water Crisis : आठ दिवसांत वाढले ४७ विहिरींचे अधिग्रहण

Water Scarcity : वाढत्या उन्हामुळे पाणी पातळीत झपाट्याने कमी येत आहे. त्यामुळे खासगी विहीर अधिग्रहणाचा आकडा ६८ वर पोचला आहे. अवघ्या आठ दिवसांत प्रशासनाच्या नोंदी ४७ खासगी विहीर अधिग्रहीत झाल्या आहेत.

Team Agrowon

Yavatmal News : वाढत्या उन्हामुळे पाणी पातळीत झपाट्याने कमी येत आहे. त्यामुळे खासगी विहीर अधिग्रहणाचा आकडा ६८ वर पोचला आहे. अवघ्या आठ दिवसांत प्रशासनाच्या नोंदी ४७ खासगी विहीर अधिग्रहीत झाल्या आहेत. यावरून भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

तर जिल्ह्यातील बारा गावात टँकरने पाणी पुरवठा केल्या जात आहे. येत्या काही दिवसांत यात मोठ्या संख्येने वाढ होण्याची चिन्हे आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून उन्हाची दाहकता कमालीची वाढली आहे. दरवर्षी साधारणतः एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईची झळ ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावी लागते. पावसाळ्यात सरासरीहून अधिक पाऊस कोसळल्यानंतरही उन्हाळ्याच्या सुरवातीलाच नदी, नाले, ओढे, छोटे तलाव कोरडे ठाक पडत आहेत.

त्याचप्रमाणे गावातील विहिरी, हातपंपसुद्धा कोरडे पडत असल्याने ग्रामस्थांचे टेन्शन वाढले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दारोदार भटकंती करण्याची वेळ येत आहे. यावर उपाययोजना म्हणून जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने पिण्याच्या पाण्यासाठी खासगी विहीर अधिग्रहण, टँकरची व्यवस्था केली आहे.

जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी सहा तालुक्यात २१ खासगी विहीर, तर सहा टँकर चालू करण्यात आले होते. परंतु अवघ्या आठच दिवसांत खासगी विहीर अधिग्रहण चक्क ६८ वर पोचले आहे. यामध्ये महागाव २६, पुसद १२, आर्णी १२, दिग्रस ७, वणी ५, दारव्हा ३, नेर, घाटंजी, झरीजामणी प्रत्येकी एक या प्रमाणे ६८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अवघ्या आठ दिवसांत ४७ खासगी विहिरींचे अधिग्रहण झाले आहे. भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

पुसद आठ, तर आर्णीत चार टँकर

जिल्ह्यातील पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावत आहे. आजघडीस पुसद तालुक्यात आठ, तर आर्णी तालुक्यात चार गावात टँकरने पाणीपुरवठा केल्या जात आहे. पुसद तालुक्यामध्ये बुटी ई, वडसद, रामपूर नगर, येलदरी, मधुकर नगर, शिवानगर, सिंगरवाडी, कारला तर आर्णी तालुक्यातील उमरीपठार, पाळोदी, सुधाकर नगर, चिमटा या चार गावांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT