Water Tanker  Agrowon
ॲग्रो विशेष

Tanker Water Supply : परभणी जिल्ह्यात केवळ एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water Scarcity : एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात उन्हाचा चटका अधिकच वाढला आहे. बाष्पीभवन तसेच उपशामुळे अनेक तलाव आटले आहे. अनेक ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनांच्या जलस्रोत कोरडे पडले आहेत.

Team Agrowon

Parbbhani News : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंतर्गत पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना अंतर्गत शेवडी (ता. जिंतूर) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिंतूर तालुक्यात ६, सोनपेठ तालुक्यात १ आणि पालम तालुक्यात १२ असे मिळून एकूण १९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात उन्हाचा चटका अधिकच वाढला आहे. बाष्पीभवन तसेच उपशामुळे अनेक तलाव आटले आहे. अनेक ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनांच्या जलस्रोत कोरडे पडले आहेत. गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यांवर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. २०२४ च्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता.

विहिरी तसेच इतर जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. तलाव, धरण भरली होती. यंदा फेब्रुवारीपासून सामन्याहून अधिक तापमान आहे. उपसा वाढल्याने स्रोत आटले. अनेक तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

शेवडी (ता. जिंतूर) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात असून दोन फेऱ्या मंजूर आहेत. सावंगी म्हाळसा येथे टँकरसाठी १ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. इटोली, पोखर्णी तांडा, देवसडी, कोरवाडी, पिंपळगाव काजळे या गावातील मिळून एकूण ६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

सोनपेठ तालुक्यातील टिकू नाईक तांडा येथे १ विहीर तर पालम तालुक्यातील बनवस, बोरगाव खुर्द, सादलापूर, रामापूर, मोजमाबाद, पिराचा तांडा, पेमानाईक तांडा,खरब धानोरा, उमरा, हनुमाननगर या ठिकाणच्या १२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT