Girna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : गिरणा धरणातून आवर्तन सुटले

Girna Dam : चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकच्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातून नुकतेच टंचाई निवारण्यासह उद्योगांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकच्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातून नुकतेच टंचाई निवारण्यासह उद्योगांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. कानळदापर्यंत (ता. जळगाव) पाणी पोचल्यानंतर आवर्तन बंद केले जाईल.

गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावात आहे. परंतु या धरणाचा सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्यास होतो. पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, एरंडोल व धरणगाव या भागात गिरणाच्या पाटचाऱ्या आहेत. परंतु धरण यंदा फक्त ५६ टक्के भरल्याने त्यातून रब्बीसाठी आवर्तन देण्यात आले नाही.

फक्त पिण्यासाठी किंवा टंचाई दूर करण्यासाठी धरणातून पाणी दिले जात आहे. यात दोन वेळेस उद्योगांसाठी पाणी दिले आहे. तर टंचाई दूर करण्यासाठी दुसरे आवर्तन नुकतेच धरणातून सोडण्यात आले आहे. धरणातून दोन हजार क्यूसेस वेगाने हे पाणी सोडण्यात आले आहे. चाळीसगाव शहरासह भडगाव, पाचोरा येथील पिण्याच्या पाण्यासाठी या आवर्तनाचा लाभ होईल.

तसेच नदीवरील दहिगाव, दापोरा येथील बंधाऱ्यातही पाणी येईल. सुमारे १४० गावांमधील शिवारासह पिण्याच्या पाण्यासंबंधीचे स्रोत यामुळे बळकट होतील किंवा त्यांना पाण्याचा स्रोत मिळेल, अशी माहिती मिळाली. धरणातून पाणी सोडल्यानंतर सुमारे सहा ते सात दिवसात ते कानळदापर्यंत पोचते.

कानळदा गावानजीक नदीत पाणी पोचल्यानंतर आवर्तन बंद केले जाईल. कानळदा गावाच्या पुढे तापी नदीचे स्रोत उपलब्ध होतात. यामुळे फक्त कानळदापर्यंत हे पाणी दिले जाते. परंतु कानळदापर्यंत पाणी पोचल्यानंतर किमान दोन दिवस पाणी नदीत प्रवाही असले पाहिजे, असाही मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

गिरणा धरणातून नदीत पाच वेळेस आवर्तन सोडले जाते. तसे आदेश शासनाने पाटबंधारे विभागास दिले आहेत. यामुळे नदीत पाणी येऊन पुनर्भरण होते व शिवारातील कूपनलिका, विहिरींच्या स्त्रोतांना आधार होतो असा दावा प्रशासनाने केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT