Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : 'जायकवाडी'च्या डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू

Jayakwadi Irrigation : गोदावरी नदीवरील पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याव्दारे यंदाच्या (२०२३-२४) रब्बी हंगामासाठी दोन पाणी आवर्तने सोडण्याचे नियोजन आहे. शुक्रवारी (ता. ३) दुपारी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे,

Team Agrowon

Parbhani News : गोदावरी नदीवरील पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याव्दारे यंदाच्या (२०२३-२४) रब्बी हंगामासाठी दोन पाणी आवर्तने सोडण्याचे नियोजन आहे. शुक्रवारी (ता. ३) दुपारी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे, अशी माहिती परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ च्या कार्यकारी अभियंता मयुरा जोशी यांनी दिली.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे यंदा हे धरण अर्धे देखील भरले नाही. सप्टेंबर अखेर झालेल्या पावसामुळे जेमतेम ४७ टक्के पर्यंत पाणीसाठा उपलब्ध झाला होता. गेल्या महिनाभरात त्यात घट झाली आहे.

या धरणात रविवारी (ता. ५) सकाळी ४५.३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. कालवा सल्लागार समिती बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याव्दारे रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. पाण्याचे पहिले आवर्तन शुक्रवारी (ता. ३) दुपारी १०० क्युसेकने पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे.

टप्प्या टप्प्याने विसर्ग वाढविण्यात येईल. येत्या तीन चार दिवसात परभणी जिल्ह्यात पाणी पोहचेल. पहिले आवर्तन २५ दिवस सुरु राहील. दुसरे आवर्तन २० जानेवारी २०२४ रोजी सोडण्यात येईल त्याचा कालावधी २५ दिवस राहील.

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचे सर्वाधिक लाभक्षेत्र हे परभणी जिल्ह्यात आहे. या मुख्य कालव्याच्या १२२ ते २०८ किलोमीटर (एकूण ८६ किलोमीटर) वितरण प्रणाली अंतर्गत शाखा कालवे, वितरिका, शेतचाऱ्यांचे मिळून एकूण ९७ हजार ४०० हेक्टर लाभक्षेत्र आहे. जिल्ह्यातील पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा, गंगाखेड या ५ तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होतो.

परभणी जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा ३१५ मिलिमीटर पावसाची तुट आहे. त्यामुळे सिंचन स्रोतांना पाण्याची उपलब्धता कमी आहे. या परिस्थितीत डाव्या कालव्याव्दारे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रब्बी पीके, ऊस, फळपीके, भाजीपाला पिकांना फायदा होईल. यंदा धरणात कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्याचा काटेकोर वापर करावा. पाण्याची नासाडी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT