Pomegranate Theft Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Theft : वाढत्या चोऱ्यांमुळे डाळिंब बागांत पहारा

Latest Agriculture News : ग्रामीण भागात घरफोड्यांबरोबरच आता फळपिकांच्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले असून कसमादे भागात डाळिंब उत्पादकांनी थेट डाळिंब बागेतच पहारा वाढवला आहे.

Team Agrowon

Nashik News : ग्रामीण भागात घरफोड्यांबरोबरच आता फळपिकांच्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले असून कसमादे भागात डाळिंब उत्पादकांनी थेट डाळिंब बागेतच पहारा वाढवला आहे. रात्रीच्या वेळेस बागेत मुक्कामाला थांबत जागते रहो, हा नारा डाळिंब उत्पादक देत आहेत.

विठेवाडी (ता. देवळा) येथील बोरसे या शेतकऱ्याने बागेतून डाळिंब फळे चोरीला जाऊ नयेत, म्हणून रात्रीच्या वेळेस डाळिंब राखण सुरू केली आहे.

ग्रामीण भागात आता फळ पिकांच्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले असून सध्या डाळिंबाला चांगला बाजारभाव असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या बागांतून डाळिंब फळे चोरीच्या घटना वाढत आहेत.

त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घबराट आहे. फळपिके चोरणाऱ्या टोळीचा बंदोबस्त बागांमध्ये रात्रीच्या वेळेस पाळत ठेवूनच होऊ शकतो. म्हणून डाळिंब उत्पादक रात्रीच्या वेळेस बागांमध्ये राखणीला थांबू लागले आहेत.

डाळिंब चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. रात्री शेतकरी शेतात नसतात, त्यामुळे चोरटे रात्री बागांतून डाळिंब तोडून ते पोत्यांमधून भरून ते लंपास करतात. ही चोरी सहज करता येते व पैसादेखील चांगला मिळतो म्हणून डाळिंब बागा असलेल्या भागांत मोठ्या प्रमाणावर चोऱ्या वाढू लागल्या आहेत.

या वर्षी डाळिंबाला चांगला बाजार असल्याने विक्रीसाठी तयार असलेल्या डाळिंबाची चोरी होऊ नये म्हणून अनेक शेतकरी रात्री जागरण करत डाळिंब बागेत पहारा देत आहेत. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने डाळिंबाच्या बागा तयार केल्या आहेत.

यासाठी डाळिंब बागेत मचाण, माळा तयार करून तसेच एक-दोन जण सोबतीला ठेवून डाळिंब उत्पादक रात्रीच्या वेळेस जागता पहारा देऊ लागले आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रात्रीची गस्त वाढवून चोरांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

डाळिंब पिकातील मर रोग, तेलकट डाग, पाऊस, शेतीमालाची नासाडी आणि पडलेले दर, पैसे घेऊन व्यापाऱ्यांचा पोबारा या समस्यांना वैतागलेल्या शेतकऱ्यांपुढे उभ्या पिकांची चोरी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. डाळिंब चोरी रोखण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.
- दीपक गुंजाळ, डाळिंब उत्पादक, तिळवण, ता. बागलाण.
निसर्गाचा लहरीपणामुळे सातत्याने अडचणीत सापडणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आपले उभे पीक चोरी होण्याचे नवीन संकट उभारले आहे. शेतातील उभ्या पिकांची चोरीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. झाडावरील डाळिंब कमी होत असल्याचा प्रकार लक्षात आला. त्यामुळे रात्रीच्या वेळी बागेतच मचाण, माळा तयार करत डाळिंबाची राखण करत आहोत.
- काशिनाथ बोरसे, डाळिंब उत्पादक, विठेवाडी, ता. देवळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Advisory : कृषी सल्ला : राहुरी विभाग

Assembly Election Kolhapur : कोल्हापुरातील ८ साखर कारखानदारांनी भरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षितता

Agricultural Issues : निसर्गाच्या परीक्षेची तयारी करा नीट

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

SCROLL FOR NEXT