Dattatray Bharane Agrowon
ॲग्रो विशेष

Washim Development : वाशिमची आकांक्षित जिल्हा म्हणून ओळख मिटवणार

Niti Ayog : निती आयोगाने वाशीमला आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केले असून, ही ओळख पुसून टाकण्याचा आपण निर्धार करीत आहोत.

Team Agrowon

Washim News : निती आयोगाने वाशीमला आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केले असून, ही ओळख पुसून टाकण्याचा आपण निर्धार करीत आहोत. जिल्हा विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनियुक्त पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

श्री. भरणे यांनी आज शुक्रवारी (ता.२८) जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. बैठकीला आ. भावना गवळी, बाबूसिंग महाराज, श्याम खोडे, किरणराव सरनाईक, सई डाहाके यांच्यासह जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एस, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे उपस्थित होते.

वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करीत भरणे म्हणाले की, पालक म्हणून या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यावर आपला विशेष भर असेल.

सर्व समाज बांधवांना कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता समान न्याय मिळेल. जिल्ह्यात शांतता, बंधुभाव, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्पर राहावे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी सूचना केली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न आणि सिंचनाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी पालकमंत्री भरणे यांनी जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्‍वरी एस. यांना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यस्तरीय प्रगती पुरस्कारात प्रथम क्रमांक, तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांना राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सर्वोत्कृष्ट कल्पना व उपक्रम यात प्रथम क्रमांक, आणि जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाचव्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT