Road Agrowon
ॲग्रो विशेष

Panand Road : शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून केले पाणंद रस्ते

Rural Development : ग्रामीण भागांत शेतांना रस्ते नसल्याने हंगामात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शासकीय योजना असूनही त्याची अंमलबजावणी योग्य प्रमाणात नसल्यानेही फारसा फायदा नाही.

Team Agrowon

Washim News : ग्रामीण भागांत शेतांना रस्ते नसल्याने हंगामात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शासकीय योजना असूनही त्याची अंमलबजावणी योग्य प्रमाणात नसल्यानेही फारसा फायदा नाही.

यामुळे येथील शेतकऱ्यांनी लोकवर्गणी करीत शेतरस्ता तयार करण्याचे काम हातात घेतले आहे. शिरपूर येथील गौळखेडा शेतशिवारातील हा पाणंद रस्ता करण्यासाठी सुमारे तीन लाख रुपये लोकवर्गणी जमा करीत काम सुरू केले.

महाराष्ट्र शासनाच्या मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजनेत शिरपूरमधील एकही रस्ता मंजूर न झाल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

२७ ऑक्टोबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार शासनाने मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना राबविण्याचे जाहीर केले आहे. राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावा या दृष्टिकोनातून मनरेगा व रोहयोच्या माध्यमांतून राबविण्यात येणार होती. मात्र मालेगाव तालुक्यातील शिरपूर गावामध्ये शासनाने एकही पाणंद रस्त्याला मंजुरात दिली नसल्याने नाराजी पसरली आहे.

या योजनेसाठी मालेगाव तालुक्यातून २६९ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. तर शिरपूर ग्रामपंचायतीच्या वतीने ३२ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. असे असताना शिरपूर येथे एकाही रस्त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने शासनाने गावातील शेतकऱ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना बनली आहे.

शिरपूर येथील गौळखेडा शेतशिवारातील पांदणरस्ता शिरपूरचे मंडळ अधिकारी देशपांडे, तसेच शिरपूर भाग दोनचे प्रभारी तलाठी गवळी यांनी करून दिला. या रस्त्यासाठी त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तीन लाख रुपये लोकवर्गणी गोळा केली.

श्रमदान करीत हा पाणंद रस्ता तयार करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास एक किलोमीटरपेक्षा जास्त हा रस्ता तयार केला जाणार आहे. लोकप्रतिनिधींची उदासीनता व निष्क्रियता यातून प्रकर्षाने दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT