Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : अतिवृष्टीच्या मदतीपासून वाशीमच्या शेतकऱ्यांना वगळले

Heavy Rain Crop Loss : या वर्षात खरीप हंगामात जून ते ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या मदतीपासून वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे.

Team Agrowon

Washim News : या वर्षात खरीप हंगामात जून ते ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या मदतीपासून वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, अशी भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र शासनाने १० डिसेंबर रोजी शासन निर्णय काढला आहे. महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतील जून ते ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र त्यामध्ये वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काही मंडलांमध्ये व इतर तालुक्यांमध्ये सोयाबीन सोंगणीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

अनेक शेतकऱ्यांचे सोंगणी केलेले सोयाबीन पाण्यामध्ये भिजले होते. तसेच भाजीपाला व इतर पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. खरीप हंगामातून लागवड खर्चसुद्धा निघाला नव्हता.

त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला. त्यादरम्यान शासनाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे पंचनामेसुद्धा केले होते. यातून वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने वगळले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT