Soybean Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rate : सोयाबीनची कमी दराने खरेदी केल्यास कारवाईचा इशारा

Soybean Rate : सोयाबीन पिकाची काढणी सध्या सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन काढून बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. मात्र, त्याची हमीभावाने खरेदी केली जात नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

Team Agrowon

Satara News : सोयाबीन पिकाची काढणी सध्या सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन काढून बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. मात्र, त्याची हमीभावाने खरेदी केली जात नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

यामुळे कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सोयाबीन खरेदीदार व्यापाऱ्यांना पत्रे पाठवून केंद्र सरकारच्या हमी भावानुसार खरेदी करण्याच्या सूचना केल्या आहेत. हमीभावाने सोयाबीन खरेदी न केल्यास कारवाईचाही इशारा बाजार समितीकडून देण्यात आला आहे.

खरीप हंगामातील पावसाच्या पाण्यावर येणारे कमी त्रासाचे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. यंदा टप्प्याटप्प्याने पाऊस झाल्याने सोयाबीनचे पीक चांगले येऊन दरही वाढल्याने चार पैसे जादाचे मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, परतीच्या पावसाने सध्या जोरदार हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक हाताशी लागेल, की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, यंदा केंद्र सरकारने किमान हमीभाव ४ हजार ८९२ रुपये जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून बाजारपेठेत विक्रीसाठी आणले, तर सरकारी हमीभाव केंद्र सुरू नसल्याने त्यांना सोयाबीन घालता येत नाही.

त्यामुळे त्यांना नाइलाजाने मिळेल त्या दराने सोयाबीनची विक्री करण्याशिवायच पर्याय राहात नाही. सध्या बाजारपेठेत उतारा बघून साडेतीन ते चार हजार दोनशे रुपयांपर्यंत दर दिला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

याची दखल घेऊन बाजार समितीकडून सोयाबीन खरेदीदार शेतकऱ्यांना पत्रे पाठवून केंद्र सरकारच्या हमी भावानुसार खरेदी करण्याच्या सूचना केल्या आहेत. हमीभावाने सोयाबीन खरेदी न केल्यास कारवाईचाही इशारा बाजार समितीकडून देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT