Aqueduct Agrowon
ॲग्रो विशेष

Aqueduct Work : वरखेड लोंढे बॅरेजचे बंदिस्त जलवाहिनीचे काम प्रलंबित

Barrage Water for Irrigation : गिरणा नदीवरील वरखेड लोंढे (ता. चाळीसगाव) येथील बॅरेजचे पाणी सिंचनासाठी शिवारापर्यंत बंदिस्त जलवाहिनीद्वारे पोहोचविण्याचे काम सुरू झालेले नाही.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्ट्यासाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या गिरणा नदीवरील वरखेड लोंढे (ता. चाळीसगाव) येथील बॅरेजचे पाणी सिंचनासाठी शिवारापर्यंत बंदिस्त जलवाहिनीद्वारे पोहोचविण्याचे काम सुरू झालेले नाही.

तत्कालीन युती सरकारने २०१४ नंतर या प्रकल्पासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला. या प्रकल्पाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. त्याचे सात दरवाजे असून, सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्राला लाभ अपेक्षित आहे. त्यात चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या तालुक्यांचा समावेश आहे.

शिवाय अनेक गावांची पाण्याची समस्यादेखील दूर होण्यास मदत होणार आहे. प्रकल्पाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले, पण शिवारात पाणी पोहोचविण्यासाठी सुरुवातीला कालव्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रियादेखील हाती घेण्यात आली होती. परंतु नंतर शेतकरी व लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनंतर पाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे शेतापर्यंत पोहोचवा, अशी मागणी करण्यात आली.

यामुळे सुपीक जमीन तशीच शेतकऱ्यांकडे राहील व उत्पादनावरही परिणाम होणार नाही. शासनाचाही सुमारे २०० कोटींवर खर्च वाचेल, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याबाबत दोन महिन्यांपूर्वी तापी पाटबंधारे महामंडळात चर्चाही झाली होती. मध्यंतरी बैठकाही झाल्या. अधिकाऱ्यांनी बंदिस्त पाइपलाइनसंबंधी आराखडा तयार करण्याची तयारी केली होती. परंतु या प्रकल्पासाठी पुढील निधी शासन देणार आहे.

हा निधी उपलब्ध झाल्यानंतरच बंदिस्त पाइपलाइनचा निर्णय अंतिम होईल. बंदिस्त पाइपलाइनसंबंधी अंतिम मंजुरी जलसंपदा विभागाकडून मिळालेली आहे की नाही, हादेखील मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहे. ही मंजुरी मिळविण्यासाठी अंतिम अहवालदेखील आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का, असाही प्रश्‍न आहे.

यामुळे बंदिस्त पाइपलाइनबाबत काम संथ दिसत आहे. चाळीसगाव, पाचोरा भागातील लोकप्रतिनिधी सत्ताधारी बंदिस्त पाइपलाइनसाठी सतत पाठपुरावा करीत आहेत. बंदिस्त पाइपलाइन होईलच, असा दावाही चाळीसगावमधून केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT