Pandharpur Yatra Agrowon
ॲग्रो विशेष

Pandharpur Magh Wari : माघ वारीसाठी पंढरपुरात वारकऱ्यांची मांदियाळी; आज मुख्य सोहळा

Team Agrowon

Solapur News : पंढरपुरात मंगळवारी (ता. २०) माघी यात्रेचा मुख्य सोहळा होत असून, राज्याच्या विविध भागांतून सुमारे दोन-अडीच लाखांहून अधिक वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या वारीसाठी कोकण, मराठवाड्यातून निघालेल्या संतांच्या दिंड्या-पालख्यांनी पंढरपुरात सोमवारी (ता. १९) प्रवेश केला. त्यामुळे एक वेगळाच उत्साह पंढरीत दाटला आहे. टाळ- मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे.

माघ वारीनिमित्त मंदिरात मंगळवारी पहाटे अडीच वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा होणार आहे. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या प्रमुख चार वाऱ्यांपैकी एक असणाऱ्या माघी वारीला वारकरी सांप्रदायामध्ये विशेष महत्त्व आहे. विशेषतः सोलापूरसह मराठवाडा, कोकणातून या वारीसाठी मोठ्या संख्येने दिंड्या-पालख्यांसह वारकरी येत असतात.

यंदाही या सोहळ्यात सहभागासाठी या भागासह राज्याच्या अन्य भागातूनही वारकरी पंढरी दाखल होत आहेत. यापैकी अनेक दिंड्या-पालख्यांनी सोमवारी पंढरपुरात प्रवेश केला. तर अनेक भाविक-वारकऱ्यांनी दशमीचा पर्वकाळ साधण्यासाठी सकाळपासूनच चंद्रभागानदीसह प्रदक्षिणा मार्गावर मोठी गर्दी केली. त्याशिवाय श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाची रांगही सोमवारी गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडच्या पुढे गेली.

पंढरपुरातील विविध मठ, मंदिरे, धर्मशाळांमध्ये भजन, कीर्तने, प्रवचने रंगली आहेत. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा अखंड जयघोष सुरू आहे. एसटी, रेल्वेसह खासगी गाड्यांतून सोमवारी दिवसभर भाविक-वारकऱ्यांची रीघ सुरूच होती. पंढरपुरातील मंदिर परिसर, स्टेशन रस्ता, एसटी बसस्थानक, ६५ एकर परिसर, चंद्रभागा नदी तीरावर सगळीकडे वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळते आहे.

मंदिर समितीकडून वारकऱ्यांना सुविधा

वारकरी-भाविकांना श्रीचा प्रसाद म्हणून मंदिर समितीकडून तांदळाची/साबुदाण्याची खिचडी वाटप करण्यात येत आहे, खिचडीबरोबर चहा व मिनरल वॉटर देण्यात येत आहे. तसेच संपूर्ण दर्शन रांगेवर ऊन, वारा, पावसापासून संरक्षणासाठी कापडाचे आच्छादन टाकण्यात आले आहे.

सुरक्षा यंत्रणेमुळे दर्शनरांग द्रुतगतीने चालून भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळत असून, आपत्कालीन व्यवस्थापन, पायाला खडे टोचू नये म्हणून म्याटिंग, कुलर-फॅन, विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, लाइव्ह दर्शन, सूचना फलक, सॅनिटरी नॅपकिन, आपत्कालीन मदत कक्ष, सीसीटीव्ही कॅमेरे, आरोग्य, अन्नछत्र इत्यादी आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणे सोयी- सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT