Solar Project  Agrowon
ॲग्रो विशेष

Warna Sugar Factory : ‘वारणा कारखाना जतला सौरऊर्जा प्रकल्प उभारणार’

Solar Project : गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी वारणा मार्चमध्ये येणाऱ्या उसास प्रतिटन २०० रुपये जादा व भाग्यवंतांना ५ बुलेट व ५ स्प्लेंडर मोटारसायकली बक्षीस देणार असल्याचे डॉ. कोरे यांनी या वेळी जाहीर केले.

Team Agrowon

Kolhapur News : ‘‘जत (जि. सांगली) येथे तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या १०० एकर जमिनीवर २० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प येत्या तीन महिन्यांत उभारण्यात येणार असून या प्रकल्पामुळे वारणेशी संलग्न असलेल्या सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे वीजबिल ५० टक्के वारणा कारखाना भरणार आहे,’’ अशी घोषणा अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी वार्षिक सभेत केली.

गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी वारणा मार्चमध्ये येणाऱ्या उसास प्रतिटन २०० रुपये जादा व भाग्यवंतांना ५ बुलेट व ५ स्प्लेंडर मोटारसायकली बक्षीस देणार असल्याचे डॉ. कोरे यांनी या वेळी जाहीर केले.

येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या ६८ व्या वार्षिक सभेत डॉ. कोरे बोलत होते. ते म्हणाले, की गतवर्षाच्या हंगामात विस्तारीकरणातील झालेल्या त्रुटी दूर केल्या असून राज्यातील आदर्श कारखाना म्हणून वारणा पुन्हा नावलौकीकास पात्र ठरेल.

तसेच कारखान्याची कर्जमुक्तीकडे वाटचाल सुरू असून शेतकऱ्यांचा सहभाग घेऊन ऊसतोडणी कार्यक्रम राबवला जाईल. मार्चमध्ये गाळप झालेल्या उसास प्रोत्साहनपर अनुदान व १० किलो साखर दिवाळीस देण्यात येणार आहे.

सचिव बी. बी. देशिंगे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. कार्यकारी संचालक एस. आर. भगत यांनी विषयवाचन केले. सभासदांनी सर्व विषय मंजूर केले. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, ऊर्जांकूर प्रकल्पाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, नवशक्ती संस्थेचे अध्यक्ष एन. एच. पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, वारणा बॅंकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, सर्व संचालक मंडळ, सभासद उपस्थित होते. प्रा. एन. आर. चोपडे, प्रा. पी. बी. बंडगर, राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT