Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Mortgage Loan : तारण सोयाबीनवरील साडेसहा लाख रुपयांचे व्याज माफ

Soybean Market Update : दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली. मात्र हंगाम संपून नव्या हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल झाले तरीही दर पाच हजारांच्या पुढे गेले नाहीत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Wardha News : दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली. मात्र हंगाम संपून नव्या हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल झाले तरीही दर पाच हजारांच्या पुढे गेले नाहीत. परिणामी तारण ठेवलेल्या सोयाबीनपोटी शेतकऱ्यांना व्याजाचा मोठा भुर्दंड बसणार होता. त्यामुळे हिंगणघाट बाजार समितीने सोयाबीनवरील तारण व्याजाचे तब्बल ६ लाख ७१ हजार ३८१ रुपये बाजार समितीने माफ करीत सोयाबीन उत्पादकांना दिलासा दिला आहे.

शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अनेक उपक्रम व योजना राबविण्यात हिंगणघाट बाजार समिती आघाडीवर आहे. अभियांत्रिकीला प्रवेशित शेतकरी, मजुरांच्या पाल्यांना अनुदानावर लॅपटॉप देण्याची योजना नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता सोयाबीनचे दर न वाढल्याच्या परिणामी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाजार समिती पुढे आली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मातेरे झाले. यंदा बुरशीजन्य रोगांमुळे ऐन काढणीपूर्वी सोयाबीन पिवळे पडून करपले. त्याचा उत्पादकतेवर परिणाम झाला. अनेक भागात एकरी एक ते दोन क्‍विंटलची उत्पादकता मिळत आहे. गेल्या हंगामातील सोयाबीन दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी हिंगणघाट बाजार समितीकडे तारण ठेवले होते. मात्र दर पाच हजारांच्या खालीच आहेत.

दरही वाढले नाहीत आणि तारण ठेवलेल्या शेतमालावर सहा टक्‍के व्याज द्यावे लागणार, यामुळे बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी, उपसभापती हरीश वडतकर, संचालक मधुकर डंभारे, प्रफुल्ल बाडे, मधुसूदन हरणे, ओमप्रकाश डालिया, उत्तम भोयर, अशोक उपासे, राजेश मंगेकर, डॉ. निर्मेश कोठारी, घनश्‍याम येरलेकर, पंकज कोचर, संजय कालरे, शुभबुध्द कावळे, हर्षद महाजन, ज्ञानेश्‍वर लोणारे, माधुरी चंदनखेडे, नंदा चांभारे यांनी तारण कर्ज माफीचा निर्णय घेतला. ॲड. कोठारी यांनी शेतकरी हिताचा हा प्रस्ताव मांडला होता. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

बाजार समितीच्या गोदामातील शेतीमाल तारणावर सहा महिन्यानंतर आठ टक्के व्याजाची आकारणी होते. त्यानुसार १११ शेतकऱ्यांचा ३६८८ क्विंटल शेतीमाल तारण होता. सोबतच त्याचा ६७ हजार रुपयांचा विमा उतरविला होता. ही संपूर्ण व्याजाची रक्कम व विमा रक्कम माफ केली आहे.

सोयाबीन दर वाढतील या अपेक्षेने गेल्या हंगामात ते तारण ठेवले. दर वाढलेच नाहीत. परंतु तारण कर्ज व त्यावरील व्याज चुकवावे लागणार आहे. यात शेतकऱ्यांची होणारी घालमेल लक्षात घेता ६ लाख ७१ हजार ३८१ रुपये तारण कर्जावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला.
- ॲड. सुधीर कोठारी, सभापती, बाजार समिती हिंगणघाट.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT