Ajara Sugar Factory Election agrowon
ॲग्रो विशेष

Ajara Sugar Factory Election : आजरा साखर कारखान्यासाठी उद्या मतदान, पालकमंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटलांची ताकद पणाला

sandeep Shirguppe

Sugar Factory kolhapur Election : मागच्या २ महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी उडाली आहे. भोगावती, बिद्रीनंतर आता आजरा कारखान्यासाठी उद्या मतदान होणार आहे.

दरम्यान बिद्री कारखान्यात एकत्र असलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील आजरा कारखान्याच्या निवडणुक प्रचारात मात्र एकमेकांविरोधात लढत असताना दिसत आहेत. आजरा साखर कारखान्यासाठी रविवारी (ता. १७) मतदान होत आहे. ३२ हजार ७८४ सभासद उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

निवडणूक प्राधिकरणाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कारखान्याच्या पाच उत्पादक गटातील मतदानासाठी ७७ तर ब वर्ग अनुत्पादक व्यक्ती सभासद व संस्था सभासद मतदानासाठी १२ मतदान केंद्रांचे नियोजन केले आहे. तर ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे, सहाय्यक निवडणूक अधिकारी सुजयकुमार येजरे, अमित गराडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीची प्रकिया होईल.

कारखान्याच्या पाच उत्पादक गटांत २५ हजार १८१ मतदार असून बिगर उत्पादक ब वर्ग गटात ७४३८ व्यक्ती सभासद तर १६५ संस्था सभासद मतदार असे ३२ हजार ७८४ इतके मतदार आहेत.

छुप्या प्रचाराला सुरुवात

प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक केंद्राध्यक्ष व पाच कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. एकूण ६२३ कर्मचारी व ५० राखीव असे ७७३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर एक पोलीस असे ८९ पोलीस व राखीव ५० पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, आज सायंकाळी प्रचाराची सांगता झाली. सभा व प्रचार फेरीबरोबर वैयक्तिक संपर्कावर दोन्ही आघाड्यांनी भर दिला आहे. आता छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT