Sugar Factories Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे जानेवारीपर्यंतचे ऊसबिल जमा

Sugar Factory Sugarcane Bill : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर १ पिंपळनेर व युनिट नंबर २ करकंब कारखान्याचे २१ ते ३१ जानेवारीअखेर प्रति टन २८०० रुपयांप्रमाणे ऊसबिल शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आले

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Tembhurni News : टेंभुर्णी : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर १ पिंपळनेर व युनिट नंबर २ करकंब कारखान्याचे २१ ते ३१ जानेवारीअखेर प्रति टन २८०० रुपयांप्रमाणे ऊसबिल शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आले असून, १५ जानेवारीअखेर ऊस तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आली असल्याची माहिती साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अध्यक्ष शिंदे म्हणाले, की विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर १ पिंपळनेर व युनिट नंबर २ करकंब येथील २०२४-२५ चा गाळप हंगाम सुरू आहे. या हंगामात युनिट नंबर १ येथे आजअखेर १० लाख ३८ हजार ७९४ टन ऊस गाळप झाले आहे. युनिट नंबर २ येथे आजअखेर ३ लाख ५२ हजार ४९५ टन उसाचे गाळप झालेले आहे.

दोन्ही युनिटचे मिळून आजअखेर १३ लाख ९१ हजार २८९ टन उसाचे गाळप झालेले आहे. या गळीत हंगामामध्ये युनिट नंबर १ पिंपळनेर व युनिट नंबर २ करकंबकडे २१ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत गाळपास आलेल्या १० दिवसाचे उसास प्रति टन २८०० रुपयांप्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. दहा दिवसाला व वेळेत पेमेंट देणाची परंपरा विठ्ठलराव शिंदे कारखान्याने कायम राखली आहे.

या ऊस बिलापोटी कारखान्याने ५७ कोटी ५७ लाख रुपये बँकेत जमा केले आहेत. या गाळप हंगामात कारखान्याने ऊस बिलासाठी ३४३ कोटी २१ लाख रुपये अदा केलेले आहेत. १ ते १५ जानेवारीअखेर ऊस तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आली असून, त्यापोटी कारखान्याने २२ कोटी ९८ लाख रुपये अदा केलेले आहेत.

१५ जानेवारीअखेर ऊस तोडणी वाहतूक बिलासाठी एकूण ७८ कोटी ६२ लाख रुपये अदा केलेले आहेत, अशी माहितीही अध्यक्ष शिंदे यांनी दिली. या वेळी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक एस. एन. दिग्रजे, जनरल मॅनेजर एस. आर. यादव व इतर अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT