Agriculture Research Center Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Research Center : कृषी संशोधन केंद्रास सुरडी येथील तूर उत्पादक शेतकरी गटाची भेट

Tur Producers Farmer : कृषी संशोधन केंद्रातून विकसित झालेल्या गोदावरी वाणाच्या सुरडी (जि. सोलापूर) येथील तुर उत्पादक शेतकरी गटाने बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रास नुकतीच भेट दिली.

Team Agrowon

Jalna News : कृषी संशोधन केंद्रातून विकसित झालेल्या गोदावरी वाणाच्या सुरडी (जि. सोलापूर) येथील तुर उत्पादक शेतकरी गटाने बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रास नुकतीच भेट दिली. सुरडी गावातील शेतकरी गटाने ठिबक सिंचनावर साडेतीनशे एकरवर लागवड केली आहे. कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरचे मार्गदर्शनाखाली सुरडी येथील शेतकरी तूर पिकाकडे आकृष्ट झाले.

या शेतकऱ्यांनी बीडीएन ७११ व आता नव्याने विकसित केलेली गोदावरी या वाणावरती शेतकऱ्यांनी भर दिला आणि आपल्या उत्पादनात भरघोस वाढ केल्याचे सुरडी गावातील शेतकरी धनाजी शेळके यांनी सांगितले. बीडीएन ७११ आणि आता गोदावरी वाणाच्या निवडीबरोबरच ठिबक सिंचनाचा वापर,

तुरीचे शेंडे खुडणे, निमार्क, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारे निर्मित जैविक बुरशीनाशक आणि दशपर्णी अर्काचा वापर आणि शास्त्रोक्त पद्धतीने तूर पिकाचे नियोजन यामुळे गावातील या शेतकरी गटाची तूर पिकाची उत्पादकता एकरी १३-१४ क्विंटलपर्यंत सरासरी उत्पादन, असल्याचे सांगितले. श्री. शेळके यांनी २०१६ मध्ये एकरी १८ क्विंटल उत्पादन घेतले आहे.

या भेटीदरम्यान त्यांनी तुर पिकातील संशोधन, नव्याने विकसित केलेल्या तुरीच्या रेणुका वाणाची माहिती घेतली. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून असणाऱ्या बाबींसोबतच आंतर पिकाचा समावेश, ठिबक संच असला तरी तूर पिकाच्या गरजेनुसार पाण्याचा अत्यंत योग्य वापर, जैविक खत, सुक्ष्म अन्नद्रव्ये, एकदल पिकांसोबत तूर पिकाची फेरपालट केल्यास तूर पीक शाश्‍वतरीत्या घेतले जाईल, असे मत कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.

तूर पिकाबरोबरच उडीद आणि मूग या पिकांचा तुरीमध्ये आंतरपीक म्हणून वापर होऊ शकतो. तसेच बीजोत्पादन, डाळ निर्मिती, तूर पिकासाठी लागणाऱ्या निविष्ठांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि प्रक्रिया उद्योग यासारखे पूरक उद्योग गावाला अधिक बळकटी देतील, असेही चर्चेदरम्यान शेतकरी मित्रांना शास्त्रज्ञांद्वारे सूचित केले गेले. भेटीदरम्यान केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. के. टी. जाधव, तूर पिकाचे वाण निर्मिती करणारे शास्त्रज्ञ डॉ. डी. के पाटील आणि डॉ. वि. के. गिते, डॉ. प्रशांत सोनटक्के उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT