Sangli News : तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीला जीवनदायी असणारी विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू झाले आहे. या योजनेत आरफळ योजनेचे पाणी दाखल झाल्याने ही योजना सुरू झाली असून याउपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील २६ गावांतील ७७०० शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याने पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील शेतीला पाणी देण्यासाठी विसापूर-पुनदी उपसा सिंजन योजना उभारली आहे. या सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील २६ गावातील ७७०० हेक्टरपेक्षा अधिक शेतीला शाश्वत पाण्याची सोय झाली आहे. मात्र, पाणीटंचाई असल्याने ही योजना सुरू करण्याची मागणी या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली. विसापूर-पुणदी ही योजना टेंभू उपसा सिंचनच्या पाण्यावर आधारित आहेत.
अर्थात तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात टेंभूचे पाणी विसापूर-पुणदी योजनेतून मिळते. टेंभू योजनेचा टप्पा क्रमांकएकवरून आरफळच्या कालव्यात पाणी सोडले जाते. ते पाणी या योजनेत येते. त्यानंतर ही योजना सुरू करून तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात दिले जाते.
तसेच आरफळ योजनाचे पाणी विसापूर-पुणदी योजनेत सोडले जाते. सध्या आरफळ योजनेचे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे आरफळचे पाणी विसापूर-पुणदी योजनेत दाखल झाले असल्याने ही योजना सुरू करण्यास अडचणी आल्या नाहीत.
चालू वर्षी या योजनेच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचे सावट आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजनेतील दोन्ही योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
विसापूर उपसा योजनेतून पेड तलावात २७ एमसीएफटी (दशलक्ष घनफूट) पाणी सोडण्यात आले असून पुणदी उपसा सिंचन योजनेतून लोंढे तलावात पाणी वितरण सुरू आहे. त्यानंतर मांजर्डे, आरवडे, हातनूर, हातणोली, धामणी, पाडळी या गावांना शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीला पाणीपुरवठा केला जाणार आहे. टेंभू उपसा सिंचन योजना सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांत समाधान
दुष्काळ असल्याने पाणीटंचाई भासत आहे. त्यामुळे विसापूर-पुणदी योजना सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार योजना सुरू केली आहे. त्यामुळे तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील कायम दुष्काळी भागासाठी शेतीचे पाणी मिळणार असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.