Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Vighnahar Cooperative Sugar Factory : ‘विघ्नहर’च्या ऊस धोरणाची १ जूनपासून अंमलबजावणी

Team Agrowon

Pune News : जुन्नर : ‘‘श्री. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची बैठक नुकतीच झाली. त्यात गळीत हंगाम २०२५-२६ साठी पुरेसा ऊस उपलब्ध होण्यासाठी लागवड हंगाम २०२४-२५ मध्ये ऊस लागवडीचे धोरण १ जून पासून सुरू करण्याचे ठरविण्यात आले,’’ अशी माहिती विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.

शेरकर म्हणाले, ‘‘आडसाली ऊस लागवडीसाठी १ जून ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंतच्या कालावधीमध्ये ‘को. ८६०३२,’ ‘को.एम.०२६५’ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली. पूर्वहंगामी लागवडीसाठी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात आला असून त्यामध्ये ‘को. ८६०३२’, ‘को. एम.०२६५,’ ‘को. व्हीएसआय १८१२१’, व्हीएसआय ०८००५’ व ‘पीडीएन १५०१२’ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी दिली आहे.’’

‘‘सुरू हंगामासाठी १ डिसेंबर २०२४ पासून ‘को - ८६०३२’, ‘को-व्हीएसआय- १८१२१’, ‘पीडीएन-१५०१२’, ‘को- ९०५७’ व ‘व्हीएसआय-०८००५’ या, तर त्यातील डिसेंबर महिन्यात ‘कोएम-०२६५’ या ऊस जातीच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार सभासद व ऊस उत्पादकांना १ जूनपासून ऊस जातीचे बेणे देण्यात येणार आहे,’’ असे शेरकर म्हणाले.


‘हुमणीचे भुंगेरे जमा करावेत’
‘‘हुमणी किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकरी व मजुरांकडून रोख रक्कम देऊन हुमणी किडीचे भुंगेरे गोळा करून कारखाना गट ऑफिसला जमा करून ते नष्ट केले जातात. सर्व ऊस उत्पादकांनी लागवड हंगाम २०२४-२५ मध्ये २५ मे ते ३० जून २०२४ या कालावधीत हुमणी किडीचे भुंगेरे गोळा करून कारखाना गट ऑफिसला जमा करावेत,’’ असे आवाहन शेरकर यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT