Maharashtra Ratna Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Ratna: विदर्भ समृद्धी कृषी प्रोड्यूसर कंपनीला ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार

Vidarbha Farmers: जानेफळ (ता. मेहकर) येथील विदर्भ समृद्धी कृषी प्रोड्युसर कंपनीला शेतकऱ्यांसाठीच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल पुण्यात आनंदी युनिव्हर्स आणि युवा महाराष्ट्र फाउंडेशनच्या कार्यक्रमात ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित केले गेले.

Team Agrowon

Akola News: जानेफळ (ता. मेहकर) येथील विदर्भ समृद्धी कृषी प्रोड्युसर कंपनीने शेतकऱ्यांसाठी सातत्याने केलेल्या कामांची दखल घेत पुण्यात आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आणि युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सन्मानाने कंपनीने शेतकरी केंद्रित कार्यात निर्माण केलेल्या विश्वासाचा आणि पारदर्शक व्यवस्थापनाचा गौरव करण्यात आला. हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी नव्याने उभारण्यात येत असलेल्या हळद प्रक्रिया प्रकल्पाची माहितीही याप्रसंगी देण्यात आली.

या प्रकल्पासाठी रुद्रायणी अॅग्रो इंडिया या कंपनीशी विपणन करार करण्यात आला असून, जानेफळ येथील हळद आता निर्यातीसाठी सज्ज होणार आहे.या कंपनीमार्फत शेतकऱ्यांना निर्यातक्षम हळद उत्पादनासाठी वेळोवेळी मार्गदर्शन दिले जाणार आहे.

हा पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी सुहास बळी, नितीन बळी, गणेश विटकर, तसेच विदर्भ समृद्धी कंपनीचे अध्यक्ष संतोष साखरे, उपाध्यक्ष मोहन प्रल्हाद धोटे, सचिव अमोल माडोकार, कार्यकारी संचालक मोहन जिवनराव धोटे, गजानन काळे यांच्यासह इतर संचालक आणि शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT