Weather Update Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update : विदर्भ तापला, पारा ३७ अंशांपार; राज्यातही चटका

बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Team Agrowon

Hawaman Update: राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कमाल तापमानाचा (Temperature) पारा ३७ अंशांच्या वर सरकल्याने विदर्भ तापला आहे.

तर उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका कायम आहे. राज्याच्या किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा झळा वाढत आहेत. बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांपार, तर बुहतांश ठिकाणी ३५ अंशांच्या वर आहे.

बुधवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वाशीम येथे ३८ अंश, तर वर्धा, नागपूर, सोलापूर, यवतमाळ आणि नांदेड येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

राज्याच्या किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (ता. २२) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

धुळे येथे ९.७ अंश तापमान होते. तर उर्वरित राज्यात किमान तापमान १२ अंशांच्या पुढे गेले आहे. राज्याच्या कमाल तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवार (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३६.७ (१२), जळगाव ३६.४ (१०.८), धुळे ३६ (९.७), कोल्हापूर ३४.८ (१९.९), महाबळेश्‍वर ३२.१ (१६.८), नाशिक ३५.३ (१२.६), निफाड ३५.३ (८.८), सांगली ३६.२ (१६.९), सातारा ३६.३ (१५.६), सोलापूर ३७.४ (१८.१), सांताक्रूझ ३४.७ (१९.६), डहाणू ३०.२ (१७.६), रत्नागिरी ३३ (१९.३), औरंगाबाद ३६ (१४.१), नांदेड ३७ (१६.८), परभणी ३६.८ (१६.९), अकोला ३८.५ (१५.६), अमरावती ३६.६ (१५.१), बुलडाणा ३५.६ (१९.२), ब्रह्मपुरी - (१६.६), चंद्रपूर ३६.२ (१६.६), गडचिरोली ३३.८ (१४.४), गोंदिया ३५.८ (१५.२), नागपूर ३७.४ (१४.६), वर्धा ३७.६ (१६.२), वाशीम ३८ (१५.४), यवतमाळ ३७.२ (१५.५)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT