Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Debt Relief Scheme : ‘महात्मा जोतिराव फुले’ कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण करा

Team Agrowon

Akola News : राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत लाभासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.

प्रोत्साहनपर लाभ मध्ये पात्र/अपात्रतेची कारणे नमूद केलेली असून सन २०१७-१८, २०१८-१९, आणि २०१९-२० या तीन वर्षांपैकी कमान दोन वर्षांत पीककर्ज घेऊन त्याची नियमित कर्ज परतफेड केली असली पाहिजे, अशी पात्रता निश्चित केली आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व ग्रामीण बँक यांच्यामार्फत ३५,६२७ कर्जखाती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली असून त्यापैकी २१,२५९ खात्यांना आजपर्यंत विशिष्ट क्रंमाक पोर्टलवर प्राप्त झाला आहे.

त्यापैकी २०,७३९ खातेदार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी २०,४८१ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ एकूण ८९.३७ कोटी रुपये एवढी रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे तसेच पोर्टलवरील १४,३१७ लाभार्थी यांचा ‘ऑनहोल्ड’ यादीमध्ये असून त्यांना अपात्र दर्शविण्यात आले आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्यासाठी महा-आयटीने ७ सप्टेंबर२०२४ पर्यंत आधार प्रमाणीकरण उपलब्ध करून दिले आहे.

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्यासाठीचा लघुसंदेश महा-आयटीमार्फत देण्यात आला आहे. तसेच या संबंधित राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकानी देखील लाभार्थी शेतकऱ्यांना व्यक्तीशः कळविण्याबाबत संबंधित बँकांना ही सूचित करण्यात आले आहे.

जे शेतकरी या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र ठरले आहेत व ज्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. तथापि ज्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही, अशा ५१४ शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखांशी संपर्क साधावा व आधार प्रमाणीकरण तत्काळ करून घेण्यात यावे, असे आवाहन उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Guaranteed Price : मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचा मुद्दा चिघळला? शेतकरी ६ हजारांवर ठाम, संयुक्त किसान मोर्चा महामार्ग रोखणार

Proso Millet : आरोग्यदायी पौष्टिक भगर

Poultry Farming: कोंबड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक

Horticulture : द्राक्ष, डाळिंब शेतीत शिंदे बंधूंचा लौकिक

Sangli Coconut Auction : कोथिंबिरीची जोडी १० हजार ५०० तर एक नारळ ६५ हजारांना, काय आहे हा विषय?

SCROLL FOR NEXT