Vegetable Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Market Update : थंडीत वाढ झाल्‍याने भाजीपाल्याचे दर स्‍थिर

Vegetable Rate Navi Mumbai : थंडीचा हंगाम सुरू झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. भाजीपाल्यासाठी असे वातावरण पोषक असते. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिर झाले आहेत.

Team Agrowon

Navi Mumbai News : थंडीचा हंगाम सुरू झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. भाजीपाल्यासाठी असे वातावरण पोषक असते. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिर झाले आहेत.

नवी मुंबईतील घाऊक बाजारात भाजीपाल्याची दररोज सहाशेहून अधिक गाड्यांची आवक होत आहे. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात ताजा भाजीपाला येत असल्याने दर नियंत्रणात आहेत. शिवाय चांगला माल असल्याने उठावही मिळत आहे.

त्यामुळे घाऊक बाजारात भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. त्याचाच परिणाम १०० रुपये किलो असणारा मटारचा भाव आता ४० ते ५० रुपये किलोवर आला आहे; तर किरकोळ बाजारात मटार ६० ते ७० रुपये किलोने विक्री केली जात आहे.

सिमला मिरचीला ३० ते ३५ रुपये किलोने भाव मिळत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलोने मिळत आहे; तर वांगी ४० रुपये किलोने विकली जात आहेत. सध्या बाजारात विविध भाज्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

थंडीत चांगला भाजीपाला बाजारात येत असतो. त्यानुसार आता बाजारात हा भाजीपाला येण्यास सुरुवात झाली असून आवकही वाढत आहे.
- मदन शिंदे, व्यापारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT