Vasantrao Naik Award Agrowon
ॲग्रो विशेष

Vasantrao Naik Award : कोल्हारच्या श्रावणी महिला गटाला वसंतराव नाईक पुरस्कार

Shravani Women's Group : मुंबई येथील वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींचा वसंतराव नाईक पुरस्काराने गौरव केला जातो.

Team Agrowon

Nagar News : भूमिहीन महिलांनी महिला बचतगटाच्या माध्यमातून दूधव्यवसाय सुरू करून स्वयंरोजगार तयार करणाऱ्या कोल्हार खुर्द (ता. राहुरी) येथील श्रावणी महिला स्वयंसहायता बचतगटाला मुंबई येथील वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचा यंदाचा वसंतराव नाईक पशुपालन व दुग्धव्यवसाय पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतीच ‘अॅग्रोवन’मध्ये या महिला बचत गटाची यशकथा प्रकाशित केली होती.

मुंबई येथील वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींचा वसंतराव नाईक पुरस्काराने गौरव केला जातो.

यंदा कोल्हार खुर्द (ता. राहुरी) येथील श्रावणी महिला स्वयंसहायता बचतगटाला वसंतराव नाईक पशुपालन व दुग्धव्यवसाय पुरस्कार जाहीर झाला आहे. ५१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

भूमिहीन तसेच अल्पभूधारक, शेतमजुरी करणाऱ्या महिलांनी दहा वर्षांपूर्वी महिला आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून महिला बचतगट केला. स्वयंबचत तसेच बॅंकेकडून मिळालेल्या अल्प कर्जावर गाई खरेदी करून दूध व्यवसाय सुरू केला.

आज या महिला रोजगारांत स्वयंपूर्ण झाल्या आहेत. महिनाभरापूर्वी ‘अॅग्रोवन’ने पहिल्यांदा या गटाचे काम यशकथेतून समोर आणले. त्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिला असल्याचे प्रतिष्ठानचे सचिव दीपक पाटील यांनी सांगितले.

महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक संजय गर्जे, तालुका समन्वयक महेश आबुज, सहयोगिनी शबनुर शेख यांनी गटातील महिलांचे पुरस्काराबद्दल स्वागत केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT