Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : कृषी विभागात अनेक पदे रिक्त

Vacant Post In Agriculture Department : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी तंत्र अधिकारी, ममुराबाद येथील माती व पाणी परीक्षण, जैविक प्रयोगशाळेतील विविध पदे रिक्त आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : शेतकऱ्यांच्या विकासाचा बिंदू असलेल्या कृषी विभागात अनेक प्रमुख पदांवर पूर्णवेळ अधिकारी नाहीत. यामुळे कृषी विकासाला खीळ बसत असून, कामकाजावर परिणाम झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी तंत्र अधिकारी, ममुराबाद येथील माती व पाणी परीक्षण, जैविक प्रयोगशाळेतील विविध पदे रिक्त आहेत.

प्रभारी मंडळी कार्यरत असून, कामे रेंगाळत आहेत. कृषी सहायकांची 50 टक्के पदे रिक्त आहेत. या विभागात कृषीऐवजी अन्य कामांत कर्मचाऱ्यांना गुंतवून ठेवले जात असल्याची कुजबूजही सुरू असून, प्रभारीराजचा फटका कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही बसत आहे.

धोरणत्मक निर्णय प्रभारी अधिकारी घेत नाही. त्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, सूक्ष्मसिंचन अनुदान व इतर योजनांच्या तक्रारी वाढल्या आहेत. यावर कुठलीही कार्यवाही होत नसल्याची स्थिती आहे. यातच काही अधिकारी जिल्ह्यात नियुक्तीसाठी इच्छुक आहेत.

परंतु त्यांची नियुक्ती मंत्रालय स्तरावरून रखडली आहे. त्यांचे बदली आदेश, प्रस्ताव धूळ खात पडले आहेत, अशी माहिती मिळाली. जिल्ह्यात राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करणारे दोन वरिष्ठ मंत्री आहेत. परंतु कृषी विभागात अनेक महिने मुख्य पदे रिक्त कशी असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

जे महत्त्व महसुली, जिल्हा परिषद या यंत्रणांना दिले जाते, तेच महत्त्व कृषी विभागास दिले जात नसल्याची कुरबूर आहे. कुणी लक्ष देत नसल्याने कृषी विभागातील पदे रिक्त राहत आहेत, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT