Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : उत्तर प्रदेशात सर्वाधिक ८५ साखर कारखाने सुरू

Sugar Season : देशातील साखर हंगाम एक ऑक्टोबर पासून सुरू झाला असून यंदाच्या हंगामात उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे ८५ साखर कारखाने सुरू झाले आहेत.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : देशातील साखर हंगाम एक ऑक्टोबर पासून सुरू झाला असून यंदाच्या हंगामात उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे ८५ साखर कारखाने सुरू झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा १० साखर कारखाने यंदा उत्तर प्रदेशात जादा सुरू झाले आहेत. १५ नोव्हेंबर अखेर महाराष्ट्रात अजून एकाही कारखान्यांनी गाळप सुरू केले नाही. गेल्या वर्षी याच कालावधीत महाराष्ट्रात तब्बल १०३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते.

देशात १५ नोव्हेंबर अखेर १४४ साखर कारखान्यानी हंगाम सुरू केला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत २६४ साखर कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले होते. यंदा महाराष्ट्रातील कारखाने अद्याप सुरू न झाल्याने याचा परिणाम हंगामाच्या प्रारंभी झाला आहे.

देशात आतापर्यंत सात लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी १३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशात सर्वाधिक चार लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर कर्नाटकात दोन लाख टन साखर तयार झाली. पहिल्या महिन्याच्या कालावधीत उत्तर प्रदेशात सरासरी उतारा ७.८ टक्के तर कर्नाटकाचा ८ टक्के आहे.

कर्नाटकात ४० कारखान्यांनी गाळपास प्रारंभ केला आहे. उत्तर प्रदेश व कर्नाटक वगळता अन्य कोणत्याही राज्यांमध्ये साखरेचा हंगाम फारसा वेगाने सुरू झाला नाही. गुजरातमध्ये तेरा कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशात ४८ लाख टन तर कर्नाटकात २६ लाख टन उसाचे गाळप झाले.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा आघाडीच्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र कर्नाटकमध्ये साखरेचे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी पाणी टंचाईमुळे मध्य महाराष्ट्र व कर्नाटकात काही ठिकाणी लागवड कमी झाल्याने त्याचा परिणाम यंदाच्या हंगामावर होईल असे महासंघाचे म्हणणे आहे.

यंदा उत्तर प्रदेशाची सरशी

गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये १०३ लाख टन महाराष्ट्रात ११० लाख टन तर कर्नाटकमध्ये ५३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा उत्तर प्रदेशमध्ये ९८ लाख टन महाराष्ट्रात ८७ लाख तर कर्नाटकमध्ये ४५ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, अशी शक्यता महासंघाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT