Agricultural Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Technology : बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये तंत्रज्ञान वापरा

पेनूरचे प्रगतिशील शेतकरी सिद्धेश्‍वर माने यांनी त्यांचे द्राक्ष शेतीतील अनुभव कथन केले.

Team Agrowon

Solapur News : शेतीमध्ये बदलत्या हवामानाला (Climate Change) पूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे आणि या शेतीतंत्रज्ञानाची (Agriculture Technology) माहिती, मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्रासारख्या (Agricultural Science Center) संस्थाकडून शेतकऱ्यांना मिळू शकते, त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क वाढवावा, असे आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक तथा प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय अमृतसागर यांनी मोहोळ येथे केले.

मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या उद्‌घाटन प्रसंगी डॉ. अमृतसागर बोलत होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, सोलापूर येथील भरडधान्य संशोधन संचालनालयाचे प्रभारी अधिकारी तथा प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. बसवराज रायगोंड, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुवर, मोहोळच्या कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विठ्ठल पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे या वेळी उपस्थित होते.

डॉ. वळकुंडे यांनी प्रास्ताविकात कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. काजल म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पंकज मडावी यांनी आभार मानले.

तांत्रिक सत्रे, शिवारफेरी

तांत्रिक सत्रात डॉ. सोमकुवर यांनी द्राक्ष पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन, डॉ. बसवराज रायगोंड यांनी पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व, उत्पादन व उद्योजकता संधी यावर मार्गदर्शन केले.

तर पेनूरचे प्रगतिशील शेतकरी सिद्धेश्‍वर माने यांनी त्यांचे द्राक्ष शेतीतील अनुभव कथन केले. त्याशिवाय इथल्या प्रक्षेत्रावर शिवारफेरीचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात डॉ. विशाल वैरागर यांनी प्रक्षेत्रावरील विविध प्रात्यक्षिक युनिट व फळ पीक संग्रहालयाबाबत माहिती दिली.

दिनेश क्षीरसागर यांनी प्रक्षेत्रावरील पोषणमूल्य आधारित शेती पद्धती व पोषण परसबाग प्रात्यक्षिकाची माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT