Paddy Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : मुळशीत भात काढणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर; भात काढणीची लगबग

Harvesting Season in Mulshi : मुळशी तालुक्यात भात काढणीची मोठी लगबग सुरू आहे. तसेच मजूरटंचाईमुळे शेतकरी भात कापणी यंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले आहेत.

Team Agrowon

Pune News : मुळशी तालुक्यात भात काढणीची मोठी लगबग सुरू आहे. तसेच मजूरटंचाईमुळे व कमी वेळेत काम करण्यासाठी शेतकरी भात कापणी यंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले आहेत.

तालुक्याच्या पूर्व भागात भात काढणी यंत्राचा प्रामुख्याने वापर होत आहे. घोटावडे, भरे, लवळे, पिरंगुट, रिहे, जवळ, कासारअंबोली, उरवडे तसेच पौड ते माले, कोळवण खोऱ्यातील शेतकरी यंत्रांचा वापर करत आहेत.

एका तासात एक एकर कापणी व मळणी करून होते. त्यास सध्या चार हजार दर आकारला जात आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी अशी यंत्रे विकत घेतली आहेत. त्याचे भाडे चांगले मिळत असल्यामुळे त्यांना उत्पन्नाची सोय झाली आहे.

तालुक्यात कुशल शेत मजुरांची मोठी टंचाई आहे. मजुरीचे दर वाढले आहेत. तसेच मजुरांकडून भात कापणी केल्यावर ते खाचरात दोन दिवस वाळत घालावे लागते. त्या दरम्यान पाऊस झाला तर मोठे नुकसान होऊन तांदूळ डागाळलेला मिळतो व विकला जात नाही, असे घोटावडे येथील शेतकरी शंकर शेळके यांनी सांगितले.

भात कापणी झाल्यावर त्याची झोडणी करावी लागते. उफणणी केल्यावर भात मिळतो. या दरम्यान मोठ्या प्रमाणावर वेळ व मजूर लागतात. त्या कामांना एकरी १५ ते २० हजार रुपये खर्च येतो, असे रिहे खोरेतील शेतकरी विलास केमसे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT