Banana Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Crop Damage: बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस; ४२०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

Unseasonal Stormy Rain: बुलडाणा जिल्ह्यात मागील २४ तासांत वादळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. सुमारे ४२०० हेक्टरवरील मका, कांदा, ज्वारी, गहू आणि फळपिके उद्ध्वस्त झाली असून, शेतकरी मदतीसाठी सरकारकडे मागणी करत आहेत.

Team Agrowon

Buldana News: मागील २४ तासांत जिल्ह्यात नऊ तालुक्यांत वादळी पावसाने धुळधाण उडवून दिली. या आपत्तीत सुमारे ४२०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. यात सर्वाधिक नांदुरा तालुक्यात १६५५ हेक्टरचे नुकसान झालेले आहे.

या भागात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून कधी हलक्या सरींनी हजेरी दिली. मात्र बुधवारी (ता. दोन) रात्री बुलडाणा, चिखली, नांदुरा, मोताळा, मलकापूर, खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यांमध्ये वादळी पाऊस झाला. यामुळे मका, कांदा, ज्वारी, गहू, संत्रा, लिंबू, पपई, आंबा, भुईमूग, भाजीपाला व इतर फळपिकांचे अतोनात नुकसान झाले.

जिल्ह्यात सर्वाधिक १६५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान नांदुऱ्यातील आहे. या पाठोपाठ खामगाव तालुक्यात ९५४ हेक्टर, मोताळा ७०२ हेक्टर, संग्रामपूर ५९९ हेक्टर, बुलडाणा ८३, मलकापूर ९०, चिखली १२, जळगाव जामोद ८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. उपरोक्त तालुक्यात ४१८२ हेक्टरवर नुकसान झाले.

अकोल्यात पिकांचे नुकसान

गेल्या २४ तासांत अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मका, ज्वारी, कांदा, आंबा, केळी व इतर पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी रात्री उशिरा पावसाला सुरुवात झाली. तेल्हारा, बार्शीटाकळी, बाळापूर या तालुक्यांमध्ये पाऊस झाला. तेल्हारा तालुक्यात पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गहू, ज्वारी, कांदा, आंबा, केळी पिकाचे नुकसान झाले आहे.

कंडारी गावात बुधवारी (ता. दोन) झालेल्या वादळी पावसामुळे माझ्यासह इतर अनेक शेतकऱ्यांच्या केळी व पपईच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. मका पीकही भुईसपाट झाले. माझ्या शेतात केळीचे घड व पपई पूर्णतः शेतात तुटून खाली पडली. शासकीय यंत्रणांनी त्वरित या नुकसानीचे सर्व्हे करून आम्हा शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा.
शिवाजीराव भाकरे, पुरस्कार प्राप्त शेतकरी, कंडारी, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT