Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain In Jalna : आंबड, घनसांगवी तालुक्यांत अवकाळी पावसाची हजेरी

Weather Update : अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्यासह मोसंबी, आंबा आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले.

Team Agrowon

Jalna News : अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट (Hail) झाल्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्यासह मोसंबी, आंबा आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले. उन्हाळ हंगामातील टरबूज, खरबूज आदी पिकांना मोठा फटका बसला.

मंगळवारी (ता. २५) दुपारी वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली.

खरीप हंगामातील अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची मदत अद्याप मिळालेली नाही आणि आता त्यातच मंगळवारी (ता. २५) झालेली गारपीट यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

घनसावंगी तालुक्यात व ग्रामीण भागात मंगळवार (ता.२५)रोजी दुपारी अचानक दुपारी दोन वाजेच्या दरम्यान वादळ व वाऱ्यांने जोरदार धुमाकूळ घातला दरम्यान जोरात पाऊसही झाला.

दैठणा खुर्द, तीर्थपुरी, घनसावंगी , कुंभार पिंपळगाव या भागात काही प्रमाणात गारपीटही होऊन मध्यम व हलक्या स्वरूपात जोरदार पाऊस झाला या पावसामुळे कांदा बीज या पिकाचे नुकसान झाले. त्याचबरोबर मोसंबी , आंबे, या फळबागात झाडाखाली मोसंबी व आंब्याचा सडा पडलेल्याचा दिसून आला.

अंगूर व डाळींबाचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने नागरिक ची चांगली धावपळ उडाली मागील महिन्यापासून अवकाळी पावसाने घनसावंगी तालुक्यात काही प्रमाणात सुटका झाली होती.

परंतु मंगळवार( ता .25 ) रोजी झालेल्या पावसाने नुकसानीची झळ घनसावंगी तालुक्याला ही बसली यामुळे शेतकरी वर्गात व नागरिकांत अस्वस्थेचे वातावरण निर्माण झालेआहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT