Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : नाशिक जिल्ह्यात २३ गावांमध्ये अवेळी पावसाचा फटका

Rain Hit Crop Damage : नाशिक जिल्ह्यात २६ ते २९ डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने वर्तविला होता. मात्र, शुक्रवार (ता. २७) रोजी जिल्ह्यात मध्यम ते हलक्या पावसाने हजेरी लावली.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात २६ ते २९ डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने वर्तविला होता. मात्र, शुक्रवार (ता. २७) रोजी जिल्ह्यात मध्यम ते हलक्या पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये दिंडोरी, नाशिक व येवला या तीन तालुक्यातील २३ गावांमध्ये अवेळी पावसामुळे नुकसान झाल्याने १७२ हेक्टरला फटका बसल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक माहिती अहवालावरून समोर आले आहे.

जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासह निफाड, सिन्नर तालुक्यात शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. ढगाळ हवामानामुळे जिल्ह्यातील थंडी कमी झाली आहे. तर किमान तापमानात वाढ झाली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवारी जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला होता. शनिवारी जिल्ह्यात ग्रीन अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पाऊस पडण्याचा कुठलाच अंदाज नाही. शुक्रवारी बागलाण तालुक्यातील पश्चिम भागातील अंतापूर, भूयाने, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, कसबे सुकेणे, चांदोरी या भागात रात्री आठच्या सुमारास १५ ते ३० मिनिटे पाऊस पडला. सिन्नर तालुक्यातही काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने या वातावरणाचा द्राक्षांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. पावसापासून द्राक्ष बागांचे संरक्षण व्हावे, यादृष्टीने फवारण्या सुरु झाल्या आहेत. पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबरमध्ये व डिसेंबर महिन्यात काही दिवसांपूर्वी मॉन्सुनोत्तर पावसाच्या तडाख्यातून शेतकरी सावरत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यातच आगाप छाटण्या झालेल्या द्राक्ष बागा पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहेत तर काही तुरळक ठिकाणी काढणी सुरू आहे. मात्र, या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती असून पीक संरक्षण खर्च वाढता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दिसून आलेले नुकसान व कामावर परिणाम:

द्राक्षबागांवर भुरी,करपा रोगाचा प्रादुर्भाव

रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवड थांबली

काढणी सुरू असलेल्या नवीन खरीप, लेट खरीप कांदा पावसात भिजल्याने नुकसान

कांद्यावर करपा व माव्याचे प्रमाण वाढते

जनावरांचा चारा भिजल्याने पशुपालकांसमोर अडचणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT