Crop Damage
Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Rain : पाच जिल्ह्यांत अनेक भागांत अवकाळी पावसाचा दणका

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात (Marathwada) अनेक भागांत गत दोन दिवसांपासून विजांचा कडकडाट व वादळासह हजेरी लावणाऱ्या पावसाचा गहू, हरभरा, मका, ज्वारी, या पिकांसह आंबा आणि इतरही फळ पिकांना (Crop damage) मोठा दणका बसला आहे.

पावसाची तीव्रता मंडळनिहाय कमी अधिक असली, तरी शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज पडून पशुधनाचीही प्राणहानी झाल्याची माहिती आहे.

मराठवाड्यात काही ठिकाणी सोमवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत वादळासह हजेरी लावणाऱ्या पावसाने सुरू केलेले नुकसानीचे सत्र मंगळवारी (ता. ६) ही सुरूच होते.

छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत अवकाळी पावसाची तीव्रता अधिक होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ६५ मंडलांत ०.५ ते १५.३ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर व गंगापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता.

जालना जिल्ह्यातील सर्व ४९ मंडलांत पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लागली. जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, बदनापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता.

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी २७ मंडलांत कमी अधिक पाऊस झाला. परळी, बीड, गेवराई, आष्टी, माजलगाव तालुक्यांतील तुरळक मंडलात, तसेच शिरूर कासार व वडवणी या दोन तालुक्यांतील सर्व मंडलांत ५ मिलिमीटरपर्यंत अवकाळी पाऊस झाला.

आष्टी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीपासूनच वादळी वारा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे लिंबू, संत्रा च्या बागेचे नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यातील काही ठिकाणी तुरळक गारासह रिमझिम पाऊस पडला.

लातूर जिल्ह्यातील ६० पैकी १४ मंडलांत पावसाची हजेरी लागली. त्यामध्ये लातूर, औसा, अहमदपूर, उदगीर, शिरूर अनंतमाळ व चाकूर तालुक्यांतील मंडळांचा समावेश आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर सर्वात कमी राहिला. या जिल्ह्यातील ४३ पैकी वाशी व कळंब तालुक्यातील प्रत्येकी एका मंडलात तुरळक पाऊस झाला.


वीज पडून पशुधन दगावले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महालगांव परिसरात सोमवारी रात्री मेघगर्जनेसह पाऊस झाला. यात महालगाव येथे रोहित्रावर वीज पडली.

तसेच चांदेगाव येथे विष्णू पवार यांच्या शेतात वीज पडून दोन गायीचा मृत्यू झाला. याशिवाय पैठण तालुक्यातील वडजी येथे वीज पडून रामेश्‍वर गोजरे यांचे दोन बैल मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT