Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : अवकाळीने नाशिकच्या पश्‍चिम भागाला झोडपले

Rain Update : सुरगाणा, बागलाण, देवळा व कळवण तालुक्यांत अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात सुरगाणा, बागलाण, देवळा व कळवण तालुक्यांत अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काजू व आंबा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. तर कसमादेमध्ये कांदा उत्पादकांना फटका बसला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक फटका सुरगाणा तालुक्याला बसला आहे. तालुक्यातील आंबुपाडा, बेडसे, ठाणगाव गुरूटेंभी, झगडपाडा, खोकरविहीर, कोडीपाडा, हस्ते, जाहुले या गावांना वादळासह अवकाळी पावसाने एक ते दीड तास हजेरी लावली.

यात काही घरांसह आंबा बागांचे मोठे नुकसान झाले. काहींच्या घरावरील पत्रे, कौलांचे नुकसान झाले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात आंबा झाडांखाली कैऱ्या मोठ्या प्रमाणावर गळून पडल्या. यासह काजू पिकाचेही नुकसान झाले.

अनेक गावांमध्ये घरकुल योजनेमार्फत आदिवासी लाभार्थ्यांना घरकुल योजना मंजूर झालेली असून, घर बांधण्यासाठी मातीपासून तयार केलेल्या विटांचा चिखल झाला. तर मातीचे बांधकाम केलेल्या घरांच्या भिंती पडल्या आहेत. विटभट्ट्यांचेही नुकसान आहे. पेठ तालुक्यातील अभेटी येथे वीज पडून गोपाळ महाले यांची एक म्हैस मृत्यूमुखी पडली.

कांदा पिकाचे नुकसान

कसमादे भागात अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला. यासह काही ठिकाणी कांदा बीजोत्पादन क्षेत्रात डेंगळ्यांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी कळविले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT