Unseasonal Rain agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : पाथर्डी तालुक्यात अवकाळीचा फळबांगाना फटका

Crop Damage : नगरमधील पाथर्डी तालुक्यातील काही भागात शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Team Agrowon

Nagar News : नगरमधील पाथर्डी तालुक्यातील काही भागात शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने अनेक आंब्याच्या झाडांचा मोहर, तसेच कैऱ्या गळाल्या.

काही ठिकाणी फळबागांनाही फटका बसला. तसेच मढी येथे सुरू असलेल्या यात्रेतील व्यापारी, भाविकांना त्रास सोसावा लागला.

जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारी (ता.२९) सायंकाळी पाथर्डी शहरासह तालुक्यातील निवडुंगे, मढी, तिसगाव, करंजी, टाकळी फाटा येथे अवकाळी पाऊस झाला.

जोराचा वारा सुटला. या पावसामुळे तिसगाव ते मढी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. या वादळ वाऱ्यामुळे या रस्त्याच्या लगत असलेली अनेक झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. यामुळे मढीकडे जाणाऱ्या भाविकांच्या मार्गावर अडथळा निर्माण झाला, तर काही ठिकाणी वीजवाहक ताराही पडल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला.

मढी येथे यात्रा सुरू आहे. देशभरातून भाविक चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या समाधी दर्शनासाठी गर्दी करत आहे. कालच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा मढीतील यात्रेकरू, व्यापारी, विक्रेत्यांना त्रास सोसावा लागला. शनिवारी (ता. ३०) दिवसभर काही भागात ढगाळ वातावरण राहिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT