Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : कोल्हापूर जिल्ह्याला वळवाचा तडाखा

Rain Update : अचानक सुटलेल्या वाऱ्याने काही भागात झाडाच्या फांद्या तुटून पडल्या. शहरासह उपनगरांत वीजपुरवठा खंडित झाला.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : जिल्ह्याला गुरुवारी (ता. १८) सलग दुसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाने तडाखा दिला. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पूर्व भागाला झोडपून काढलेल्या वळवाचा पावसाने गुरुवारी सर्वत्र पावसाने हजेरी लावली.

अचानक सुटलेल्या वाऱ्याने काही भागात झाडाच्या फांद्या तुटून पडल्या. शहरासह उपनगरांत वीजपुरवठा खंडित झाला. काही भागात झाडांची पडझड झाली, तर काही भागांत गारांचा पाऊस झाला.

बुधवारी (ता. १७) शिरोळ, जयसिंगपूर भागांत वळिवाने झोडपून काढले होते, तर हातकणंगले, करवीर, कागल तालुक्यांत झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी थोडासा दिलासा मिळाला.

सलग दोन दिवसांच्या पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांचे, शेतीचे नुकसान झाले. चंदगड, कागल, गडहिंग्लज तालुक्यांतही समाधानकारक पाऊस झाला. मांडेदुर्ग येथे हनुमान विद्यालयासह एका घरावरील छप्पर उडून दुसऱ्या घरावर पडून नुकसान झाले.

रामपूर येथे एका घरावर झाड कोसळले. धुमडेवाडी फाट्यानजीक झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली. माणगाव (ता. हातकणंगले) येथे वीज पडल्याने टॉवरने पेट घेतला. यामध्ये ४ लाख रुपयांचे नुकसान झाले.

उदगावला २५ घरे, शेडचे नुकसान

शिरोळ तालुक्यात बुधवारच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा उदगावला बसला. यात ‘महावितरण’चे सुमारे २१ वीज खांब जमीनदोस्त झाले, तर ४० ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. सुमारे २५ हून अधिक घरांचे व शेडचे नुकसान झाले. ग्रामविकास अधिकारी अनिल बिडकर यांच्याकडून पंचनामे सुरू केले आहेत, तर गावभागातील सुमारे १८ तास विद्युत पुरवठा खंडित होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Inspiration Story: ‘मी शेतीत आनंदी आहे’

Grape Beetle Infestation: द्राक्ष पिकावर दिसतोय उडद्याचा प्रादुर्भाव

Aarhus Farmers Market: आरुसमधील ‘फार्मर्स मार्केट’चा फेरफटका

Vechur Cow: ‘वेचूर’ गोवंशाला मिळाली नवसंजीवनी

Weekly Weather: राज्यात हलक्या पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT