Crop Damage Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Rain News : पावसाचा धुमाकूळ; चारा, पिकांची हानी सुरूच

Heavy Rain Crop Loss : मागील तीन दिवस पाऊस झाला असून, कांदा, शेतातील चारा याची नासाडी झाली आहे. शेतकरी चिंतेत असून, मशागतीची सवडही अनेकांना मिळत नसल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात या आठवड्यात विविध भागात जोरदार ते मध्यम पाऊस झाला आहे. मागील तीन दिवस पाऊस झाला असून, कांदा, शेतातील चारा याची नासाडी झाली आहे. शेतकरी चिंतेत असून, मशागतीची सवडही अनेकांना मिळत नसल्याची स्थिती आहे.

बाजरी पीक अनेक भागात उभे आहे. त्याची कापणी, मळणी रखडली आहे. अनेकांच्या बाजरीची कापणी केल्यानंतर पाऊस आल्याने मोठी हानी झाली आहे. खानदेशात मंगळवारी (ता. २७) पहटे व बुधवारी (ता. २८) रात्रीदेखील पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातील अनेक महसूल मडलांत २० मिलिमीटरपेक्षा अधिकचा पाऊस झाला.

तर काही भागांत यापेक्षा कमी पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, धरणगाव, एरंडोल, चोपडा, अमळनेर, पारोळा, भुसावळ, यावल या भागांत पाऊस झाला. धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिरपूर भागातही पावसाने दोन दिवस हजेरी लावली. नंदुरबारमध्येही नवापूर, नंदुरबार, शहादा भागात पाऊस झाला. पावसाने केळी, पपई, भाजीपाला पिकांतील सिंचन बंद झाले. पावसाने वाफसा चांगला झाला आहे.

मशागत रखडली

अनेकांचे मका, कांदा पीक उशिराचे होते. त्याची मळणी, काढणी होत नाही, तोच पाऊस आल्याने या क्षेत्रांत मशागत रखडली आहे. मशागतीसाठी शेतात ट्रॅक्टर जाऊ शकत नाही. तसेच बाजरीची काढणी, मळणीदेखील रखडली आहे. अनेकांचा कांदा शेतातच पावसाने खराब झाला आहे. धुळे, जळगाव, यावल, चोपडा भागांत कांदा, बाजरीची हानी झाली आहे.

अनेकांच्या केळीत काढणी अखेरच्या टप्प्यात आहे. या क्षेत्रात काढणी करून लागलीच मशागत करण्याचे नियोजन होते. परंतु पावसने ही मशागतदेखील रखडली आहे. तसेच अनेक शेतरस्ते खराब झाल्याने केळी काढणीला फटका बसत आहे. मशागत रखडल्याने खरिपात कापूस, मका लागवडीचे नियोजन बिघडले आहे.

कांदा, मका पिकात अनेक शेतकरी कापूस लागवडीचे नियोजन करीत होते. तर काही शेतकरी सोयाबीन पेरणीचे नियोजन करीत आहेत. काळ्या कसदार जमिनीत वाफसा नसल्याने अधिकची अडचण आहे. किमान दोन ते तीन दिवस सूर्यप्रकाशित वातावरण आवश्यक आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT